न्यूझीलंडच्या भूमीत भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अखेरच्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडवर ३५ धावांनी विजय मिळवला आणि मालिका ४-१ ने जिंकली. फलंदाजीमध्ये अंबाती रायुडू, हार्दिक पांड्या, विजय शंकर, केदार जाधव तर गोलंदाजीत युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या यांनी कमाल दाखवली. मालिकेत बाजी मारल्यानंतर पुरस्काराचा चषक हातात घेतल्यानंतर टीम इंडिया ग्रुप फोटोसाठी एकत्र आली, त्या वेळी टीम इंडियाने संघाने ‘उरी’ या चित्रपटातील How’s the Josh?? हा डायलॉग म्हणत उपस्थितांची दाद मिळवली.
Looks like the “JOSH” in the squad is “HIGH SIR”
‘HOWS THE JOSH’ – @vickykaushal09 #TeamIndia pic.twitter.com/bzsB5EelBd— BCCI (@BCCI) February 3, 2019
या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. BCCI ने हा व्हिडिओ ट्विट केला होता आणि त्यात उरी चित्रपटाचा नायक विकी कौशल यालाही टॅग केले होते. यावर विकी कौशल यानेही ट्विट केले आहे. ‘आपला भारतीय क्रिकेट संघ हा कायम Josh च्या बाबतीत High असतो आणि भारतीयांना त्याचा अभिमान आहे. मालिका विजयासाठी भारतीय संघाला शुभेच्छा!’, असे त्याने ट्विट केले आहे.
Our Indian cricket team always gets the JOSH of the nation super high and makes us all proud! Congratulations on the amazing win! INDIAAA INDIA!!! https://t.co/eAWsr1AiPM
— Vicky Kaushal (@vickykaushal09) February 3, 2019
दरम्यान, गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे अखेरच्या वन-डे सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाला २५३ धावांचं लक्ष्य पूर्ण करता आलं नाही. अखेरचा वन-डे सामना ३५ धावांनी जिंकत भारताने ५ वन-डे सामन्यांची मालिका जिंकली. तब्बल १० वर्षांनी भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये वन-डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.