बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनला यंदाच्या ‘आयफा’ (IIFA 2023) पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ‘आयफा’ सोहळ्याचे सूत्रसंचालन या वेळी विकी कौशल करीत होता. हृतिकने पुरस्कार जिंकल्यावर विकीने त्याला रंगमंचावर थांबण्याची विनंती केली. त्यानंतर दोघांनी हृतिकच्या जुन्या ‘एक पल का जीना’ या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
विकी-हृतिकचा ‘आयफा’ सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यावर विकी कौशलने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. विकी लहान असताना तो आणि त्याचा भाऊ सनी खेज यांची हृतिक रोशनबरोबर भेट झाली होती. विकीने तेव्हा हृतिकबरोबर फोटो काढला होता ही आठवण त्याने आजतागायत जपून ठेवली आहे. ‘आयफा’ सोहळ्यातील हृतिकबरोबरच्या डान्सची झलक आणि जुना फोटो शेअर करीत कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “‘आयफा’मधील तो लहानसा प्रसंग माझ्यासाठी एवढा खास होता याचा अंदाज तुम्हाला हा फोटो पाहून येईल.”
हेही वाचा : “दिल तो पागल है…,” २६ वर्षांनी माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर एकत्र; नेटकरी म्हणाले, “फक्त शाहरुख…”
‘एक पल का जीना’ या गाण्यावर हृतिकचा परफॉर्मन्स पाहून विकी कौशलने थक्क होऊन त्याच्यासमोर गुडघे टेकत त्याला सलाम ठोकला होता, विकी-हृतिकचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हृतिकबरोबर डान्स करणे किती खास होते हे आपल्या चाहत्यांना सांगण्यासाठी विकी कौशलने सोशल मीडियावर जुना फोटो शेअर केला आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी बालपणीच विकी हृतिकला भेटला, हे पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.
हेही वाचा : वर्षाभरानंतरही प्रेक्षकांना ‘चंद्रा’ची भुरळ, गाण्यानं केला नवा रेकॉर्ड; अमृता खानविलकरने शेअर केली खास पोस्ट
दरम्यान, ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यात हृतिक रोशनला ‘विक्रम वेधा’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तसेच ‘गंगूबाई काठियावाडी’साठी आलिया भट्टचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मान करण्यात आला. याशिवाय कमल हासन यांना भारतीय चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीसाठी विशेष पुरस्कार मिळाला.