‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर अभिनेता विकी कौशल प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. या चित्रपटानंतर त्याला बरेच ऑफर्स येऊ लागले आहेत. ‘उरी’चे दिग्दर्शक आदित्य धर आणि निर्माते रॉनी स्क्रूवाला पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. विशेष म्हणजे आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी त्यांनी विकीचीच निवड केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘उरी’नंतर चित्रपटाच्या निर्मात्यांना एक बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा होता. प्रदर्शनानंतर आदित्य धरने आगामी चित्रपटाच्या पटकथेवर काम करण्यास सुरुवात केली. हा चित्रपट अश्वत्थामा यांच्या आयुष्यावर आधारित असून विकी त्यात अश्वत्थामाची भूमिका साकारणार आहे. पुढच्या वर्षीपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. विकीला अश्वत्थामा यांच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेसुद्धा उत्सुक असतीलच.

विकी लवकरच करण जोहरच्या ‘तख्त’मध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. यामध्ये आलिया भट्टसुद्धा मुख्य भूमिकेत आहे. ‘तख्त’मध्ये मुघल काळातील कथा दाखवली जाणार आहे.

करण जोहर निर्मित या चित्रपटात विकी-आलियासह रणवीर सिंग, करिना कपूर, जान्हवी कपूर, अनिल कपूर, आणि भूमी पेडणेकर असे तगडे कलाकार आपले अभिनय कौशल्य पणाला लावताना दिसतील. २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vicky kaushal to play ashwatthama on screen