पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४२ जवान शहीद झाले. उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्करावर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी होता. या हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात होता. अशातच विकी कौशलच्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे दिसून आले. चित्रपटाला वाढता प्रतिसाद पाहता त्याचे स्क्रिनिंग पुन्हा वाढवण्यात आले आहेत.

‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है. ये घर मै घुसेगा भी और मारेगा भी’, असं म्हणत ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातून भारताच्या सूडाची कहाणी सांगण्यात आली आहे. जम्मू- काश्मीरमधील उरी इथल्या लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केलानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे.

वाचा : लग्नाबाबत गुप्तता राखण्यासाठी विराट अनुष्कानं दिली खोटी नावं 

सोमवारी ‘उरी’ने ६७ लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. आठ आठवड्यांची या चित्रपटाची कमाई २४०.३८ कोटी रुपये इतकी झाली आहे. ११ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची वाढती मागणी पाहता Paytm कडून या चित्रपटाचा पुन्हा एकदा प्रमोट केलं जात आहे. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाचा ऑल टाइम ब्लॉकब्लस्टर यादीत सहभाग झाला आहे. अवघ्या ४० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनविला गेला होता.

Story img Loader