रंगचिंतक मंजुळ भारद्वाज यांनी नाटकासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केलं आहे. भारद्वाज गेली ३० वर्ष नाट्यसृष्टीत काम करत आहेत. नाटक हे केवळ प्रस्थापितांचं न ठेवता ते तुमचं आमचं सगळ्यांचं करण्यासाठी त्यांनी १९९२ साली ‘एक्सपरिमेंटल थिएटर फॉउंडेशन’ची स्थापना केली. ‘लाडली’,’रेड लाईट’,’देखा देखी’, ‘विश्व’ अशा नाटकांद्वारे भारद्वाज यांनी समाजाचा आरसा तर दाखवलाच पण त्याचबरोबर समाज प्रबोधनदेखील केलं. मंजुळ भारद्वाज यांच्या नाटकांचे केवळ भारतातच नाही तर विदेशात देखील प्रयोग होतात. ‘थिएटर ऑफ रिलेव्हन्स’द्वारे नाट्यसृष्टीत रचनात्मक बदल घडवणं हे भारद्वाज यांचं ध्येय आहे. जाणून घेऊयात त्यांच्या कार्याबद्दल…
गोष्ट असामान्यांची या सिरीजमधील सर्व व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.