चाहत्यांना प्रतिक्षा लागलेल्या सुप्रसिद्ध वेबसिरीज मनी हाईस्टचा पाचवा सिझन अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नेटफ्लिक्सच्या सर्वाधिक पसंती मिळालेल्या वेब सीरिजपैकी एक असणाऱ्या ‘मनी हाइस्ट’ला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. थरारक, अभूतपूर्व, अविस्मरणीय अशा प्रकारची ही सिरीज आहे. ही स्पॅनिश सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. यातलं ‘बेला चाओ’ हे गाणं खूप प्रसिद्ध झालेलं आहे. आता याच गाण्याच्या धर्तीवर त्या गाण्याची चाल घेऊन ‘खास रे टीव्ही’ या युट्युब चॅनेलने ‘लस घ्या’ हे जनजागृती खास गाणं तयार केलं आहे.
कसं आहे नक्की गाणं?
‘बेला चाओ’ गाणं ‘मनी हाइस्ट’च्या पहिल्या सिझनमध्ये बँक ऑफ स्पेनच्या चोरीच्या दरम्यान पहिल्यांदा तुम्हाला ऐकायला येतं. नंतर वेगवेगळ्या प्रसंगाला हे गाणं पार्श्वभूमीवर ऐकायला येते. हे गाण्यात प्रोफेसर कोणत्या ही गोष्टीला विरोध कसा करायचा हे शिकवतात. या गाण्याच्या चालीवर तयार केलेलं गाणं आपल्याला करोनाची लस घेण किती महत्त्वाचं आहे हे शिकवतं. “तिसऱ्या लाटेची घोषणा झाली, लस घ्या.. लस घ्या…” असं या गाण्याची सुरुवात होते. २.30 मिनिटांच्या या गाण्यामध्ये लस घेण्याचं महत्त्व सागितलं जात.
हुबेहूब पेहरावही
या व्हिडीओमध्ये काम केलेल्या कलाकरांनी ‘मनी हाइस्ट’ सिरीजमधील लुक धारण केला आहे. त्यांच्याप्रमाणेच त्यांनी लाल रंगाचे जम्पसूट घातले आहेत. सोबतच मनी हाइस्टचे प्रसिद्ध मास्कही घातला आहे. हे गाणं विविध लोकेशनवर शूट करण्यात आलेलं आहे हे दिसून येत. अगदी रिक्षा ते सिग्नलच्या इथे झेब्रा क्रॉसिंगच्या इथेही शूट करण्यात आलं आहे. त्यासोबतच त्यांनी हातामध्ये मिम्स असणारे, घोषणा असणारे बोर्डही पकडलेले दिसत आहेत.
नेटीझन्सची पसंती
११ हजाराहून जास्त लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. तर ५०० लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. “दोन डोस झालेले ‘लसवंत’ कोण कोण हाय..?” असही ‘खास रे टीव्ही’ या युट्युब चॅनेलने कमेंट केली आहे.
तुम्हाला आवडलं का गाणं?