शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकला. या छाप्यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत आणखी काही लोकांना ताब्यात घेण्यात आले. रविवारी आर्यनला अटक करण्यात आली. ७ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने पुन्हा एकदा ड्रग्स प्रकरणात अटक केलेल्या आर्यन आणि आणखी काही लोकांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गुरुवारी आर्यनला कोर्टात सुनावणीसाठी घेऊन जात असताना त्याच्या हातात काळ्या मोत्यांचे ब्रेसलेट दिसले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी, हातात काळ्या मोत्यांचे ब्रेसलेट घातले जाते. एवढंच नाही तर हे ब्रेसलेट घातल्याने माणसाचे मन शांत राहते, अशी अंधश्रद्धा आहे. आता आर्यनने हे ब्रेसलेट अंधश्रद्धेत किंवा फॅशनमध्ये घातले आहे, हे सांगणे कठीण आहे. आर्यनचा हा व्हिडीओ झूम टीव्हीने शेअर केला आहे.

आणखी वाचा : आर्यनची केस लढणारे सतीश मानेशिंदे एका दिवसासाठी घेतायत इतकी फी…

आणखी वाचा : NCB च्या कोठडीत असणाऱ्या आर्यनसाठी McD चे बर्गर घेऊन पोहोचली गौरी खान पण…

एनसीबीच्या ताब्यात असताना आर्यनच्या हातात हे ब्रेसलेट नव्हते. त्यामुळे हे ब्रेसलेट कोणी त्याच्या घरून आणून दिल्याचे सांगितले जाते. आर्यनच्या जामीन अर्जावर शुक्रवारी म्हणजे आज सुनावणी होणार आहे. सध्या आर्यनसोबत आणखी काही लोक एनसीबीच्या ताब्यात आहेत. आता आर्यनला जामीन मिळतो की नाही याकडे शाहरुखच्या सगळ्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader