चित्रपटसृष्टीतील काही जोड्या चाहत्यांच्या मनात कायम घर करून राहतात. अशीच एक जोडी म्हणजे अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी. एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली : द बिगनिंग’, ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटानंतर प्रभास आणि अनुष्का शेट्टीच्या नात्याविषयी सर्वत्र चर्चा होऊ लागली. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी किंवा एखाद्या कार्यक्रमात हे दोघे एकत्र वावरताना दिसले की सर्वांच्या भुवया उंचावतात. या दोघांनी कधीच उघडपणे नात्याला मान्य केलं नाही. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत असंच हे दोघं म्हणत आले आहेत. दिग्दर्शक राजामौली यांच्या घरात नुकतेच सनई-चौघडे वाजले. त्यांचा मुलगा कार्तिकेयच्या लग्नातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जयपूरमध्ये कार्तिकेयचं डेस्टिनेशन वेडिंग पार पडलं. यावेळी अख्खी दाक्षिणात्य सिनेसृष्टी जयपूरमध्ये दाखल झाली होती. अर्थातच राजामौली यांचे दोन लाडके कलाकार या विवाहसोहळ्याला हजेरी लावणार नाही असं होणार नाही. प्रभास आणि अनुष्का दोघंही या लग्नाला उपस्थित होते आणि या लग्नातील दोघांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

वाचा : ‘राजश्री प्रॉडक्शन’च्या चित्रपटात चार नवीन चेहरे

या व्हिडिओमध्ये प्रभास आणि अनुष्का पारंपरिक वेशभूषेत पाहायला मिळत आहेत. आंतरपाठ सुरू असताना स्टेजवर एका बाजूला हे दोघं उभे आहेत. लग्नात प्रभास-अनुष्काला एकत्र पाहून पुन्हा एकदा त्यांच्या नात्याची चर्चा होऊ लागली आहे.