India’s Got Latent : ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये युट्यूबर ‘रणवीर अलाहाबादिया’ने एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्याच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद झाला. सोशल मीडियावर रणवीरविरोधात संतापाची लाट उसळली. राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनी त्याच्या वक्तव्याचा निषेध केला. आता तर सर्वोच्च न्यायालयानेही रणवीरला खडे बोल सुनावले आहेत. याचदरम्यान, अशाच एका मराठी शोचा व्हायरल व्हिडीओ चर्चेत आला आहेत. व्हिडीओत दिसतंय, त्यानुसार या शोचं स्वरुपही काहिसं ‘इंडियाज गॉट लेटेंट’सारखं आहे.
३ जानेवारी रोजी ‘मराठी लिजेंड्स’ नावाने पुण्यातील श्रीराम लागू रंग अवकाश येथे एक शो झाला. या शोमध्ये ‘बिग बॉस मराठी’ फेम मीरा जगन्नाथ, पुष्कर बेंद्रे, मंदार भिडे, आकाश मेहता व कपिल अग्रवाल हे जजेस होते. या शोमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात अश्लील विनोद केले जात आहेत.
‘मराठी लोक यासाठी तयार नाहीत’, असा टेक्स्ट या व्हिडीओवर लिहिला आहे. मीम्स सिंडीकेट नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.
पाहा व्हिडीओ –
‘आता मराठीत पण ही झोपडपट्टी चालू झाली वाटतं’, ‘ह्यांना पण द्या दणका.. पिढी नसावणारे’, ‘महाराष्ट्रात स्वतः चे नवीन टॅलेंट वापरा नको ते कशाला कॉपी करताय?’ ‘जमत नाही आहे बंद करून टाका हे’, ‘घाणेरडी संस्कृती आणण्याचा प्रयत्न’, ‘शिकलेले 3rd क्लास अनाडी’, ‘हे असले शो बंद करा आधी’, ‘रणवीर अलाहाबादियासारखं होईल यांचं पण,’ अशा कमेंट्स युजर्स या व्हिडीओवर करत आहेत.

रणवीर अलाहाबादियाचे प्रकरण नेमके काय?
‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला विचारलं की, “तुला तुझ्या आई-वडिलांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल?” यापैकी कोणताही एक पर्याय निवडायला रणवीरने सांगितलं. रणवीरचा प्रश्न ऐकल्यानंतर समय रैना म्हणतो की हे सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न आहेत. रणवीरच्या प्रश्नाची ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर वादाला तोंड फुटलं. अनेकांनी त्याच्या व समय रैनाविरोधात पोलिसांत तक्रारी दिल्या. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले असून रणवीरला कोर्टाने खडे बोल सुनावले आहेत.