नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या ‘मुन्ना मायकल’ चित्रपटासाठी खूप चर्चेत आहे. या चित्रपटात नवाजुद्दीनसोबतच टायगर श्रॉफसुद्धा भूमिका साकारणार आहे. नवाजुद्दीन आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेसाठी जोरदार तयारी करत आहे. मात्र रिअल लाइफमध्ये नवाजुद्दीन ही तयारी करत नसून ‘मुन्ना मायकल’मधील नवीन गाणं ‘स्वॅग’साठी तो डान्स शिकतोय. या गाण्यात बॉलिवूडचा डान्सिंग किंग टायगर श्रॉफसोबत तो स्टेज शेअर करणार आहे. अभिनयात दमदार कामगिरी केलेल्या नवाजुद्दीनला डान्स फारसे जमत नसल्याने टायगर श्रॉफसोबत कसा डान्स करेल याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.
याआधी २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फ्रिकी अली’ चित्रपटात नवाजुद्दीनचा डान्स पाहायला मिळाला होता. मात्र ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटाच्या माध्यमातून मायकल जॅक्सनला श्रद्धांजली देण्यात येणार असल्याने उत्तम डान्स येणे अपेक्षितच आहे. ‘इरॉस नाऊ’ने ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये तो टायगर श्रॉफ त्याला डान्स शिकवतानाचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नवाज पुरेपूर प्रयत्न करत असून लवकरच तो डान्समध्येही दमदार कामगिरी करेल असे चित्र दिसत आहे.
Practice makes Mahindar perfect! #Swag coming soon@Nawazuddin_S @iTIGERSHROFF #MunnaMichael @sabbir24x7 @vikirajani @NextGenFilm pic.twitter.com/H3dQvufW6y
— Eros Now (@ErosNow) July 3, 2017
वाचा : ताजमहाल पाहायला गेलेल्या या अभिनेत्रीला लोकांनी ओळखलेच नाही
‘स्वॅग’ हे गाणे पाच जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘मुन्ना मायकल’मध्ये डान्ससोबतच अॅक्शनचा परिपूर्ण तडकाही दिसणार आहे. मात्र चित्रपटाचे मुख्य आकर्षण म्हणजे नवाजुद्दीनचा डान्स असेल. नवाज पहिल्यांदा या सिनेमात डान्स करताना दिसणार आहे. त्याच्या अभिनयाचे तर लाखो चाहते आहेत पण आता तो डान्सही तेवढ्याच तोडीचा करतो की नाही हे तर येणारा काळच ठरवेल. शब्बीर खान दिग्दर्शित मुन्ना मायकल हा सिनेमा येत्या २१ जुलैला प्रदर्शित होणार आहे.