उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचे १२ जुलै रोजी राधिका मर्चंटशी लग्न होणार आहे. अंबानींच्या घरी लगीनघाई सुरू झाली असून २ जुलैपासून विविध समारंभांना सुरुवात झाली आहे. अंबानींचे घर ‘अँटिलिया’वर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आणि या ठिकाणी पाहुण्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

बुधवारी (४ जुलै रोजी) मुकेश अंबानी यांच्या घरी ‘मामेरू’ समारंभ पार पडला. या समारंभासाठी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी व अंबानी कुटुंबियांचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते. नीता अंबानी यांच्या माहेरून त्यांची आई पूर्णिमा दलाल व बहीण ममता दलाल या समारंभासाठी आले होते, नीता अंबानी यांनी त्यांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं.

Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Sanjay Raut On MNS chief Raj Thackeray Uddhav Thackeray meet
Udhhav Thackeray-Raj Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार? भूमिका स्पष्ट करत राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह हे त्यांचे…”
Raj Thackeray and Uddhav Thackeray Came Together
Raj and Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण
Raj Thackeray On kalyan society dispute
Kalyan Society Dispute : कल्याण मारहाण प्रकरणावर राज ठाकरेंची संतप्त पोस्ट; सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत म्हणाले, “मारहाण झाली त्याची आई-बायको…”
Balasaheb Thackeray memorial work, mmrda, shivaji park
बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे ९९ टक्के काम पूर्ण, महिनाभरात पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन
Sanjay Raut on Uddhav Devendra meeting (1)
“तू राहशील किंवा मी”, फडणवीसांना आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन; राऊत म्हणाले, “तोफा थंडावल्या”
Uddhav Thackeray Meets CM Devendra Fadnavis Rahul Narwekar
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी घेतली फडणवीस, राहुल नार्वेकरांची भेट; सुनील प्रभूंनी सांगितलं नेमकी चर्चा काय झाली?

Video : अनंत – राधिकाच्या ‘मामेरु’ समारंभासाठी अंबानींचं घर सजलं! काय आहे ही गुजराती प्रथा?

‘मामेरू’ समारंभासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व त्यांचे पूत्र तेजस ठाकरेही पोहोचले होते. यावेळी रश्मी ठाकरे फुलांची डिझाईन असलेली केशरी रंगाची सुंदर पैठणी नेसून आल्या होत्या, तर तेजस ठाकरे यांनी कुर्ता घातला होता. नीता अंबानी व त्यांच्या दोन्ही सूनांनी ‘बांधणी’ प्रिंटचे पोशाख या दिवसासाठी निवडले होते, यातच रश्मी ठाकरेंच्या पैठणी लूकने लक्ष वेधून घेतलं. या माय-लेकाचा अंबानी कुटुंबाच्या समारंभातील व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडीओ विरल भयानी या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

दागिने, किराणा सामान अन् ‘इतक्या’ लाखांचा चेक…; अंबानी कुटुंबाने सामूहिक विवाह सोहळ्यात ५० गरीब जोडप्यांना काय-काय दिलं? जाणून घ्या…

या समारंभाला अभिनेत्री जान्हवी कपूर, तिचा बॉयफ्रेंड शिखर पहारिया, अभिनेता वीर पहारिया, सेलिब्रिटिंचा बेस्ट फ्रेंड ओरी यांच्यासह इतर अनेक जण उपस्थित होते. यावेळी वाजत गाजत ‘मामेरू’ घेऊन पोहोचलेल्या दलाल कुटुंबाचं अंबानी कुटुंबियांनी आनंदाने स्वागत केलं.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वी अंबानी कुटुंबाने ५० गरीब जोडप्यांच्या लग्नाचं आयोजन केलं होतं. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी मंगळवारी पालघरमध्ये ५० गरीब मुलींचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. नवीन जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण अंबानी कुटुंब पालघरला आले होते. सामूहिक विवाह सोहळा पार पडताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या इतर कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

Video: मामेरु कार्यक्रमाला ‘अशी’ झाली अंबानींच्या होणाऱ्या लाडक्या सूनेची जबरदस्त एन्ट्री, सुंदर लूकने वेधलं लक्ष

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न १२ जुलै रोजी आहे. त्यांचे लग्न रिलायन्स कंपनीच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या लग्नात देशासह जगभरातील अनेक प्रसिद्ध लोक उपस्थित राहणार आहेत. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ जुलै रोजी एका शुभ आशीर्वाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये सर्व पाहुणे नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देतील. यानंतर १४ जुलैला या जोडप्याचं रिसेप्शन होणार आहे.

Story img Loader