Anant Radhika Wedding: अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचे लग्न शुक्रवारी (१२ जुलैला) मोठ्या थाटामाटात पार पडले. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. गेले काही दिवस सातत्याने अनंत राधिकाच्या लग्नाचे सोहळे सुरू आहेत, अशातच अंबानींच्या मोठ्या सूनबाईं श्लोका अंबानीचा (Shloka Ambani) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अनंत- राधिकाच्या लग्नाचे कार्यक्रम

मामेरू समारंभ, गृहशांती पूजा, शिव पूजा, संगीत नाईट, हळदी, मेहंदी, लग्न, शुभ आशीर्वाद सोहळा व रिसेप्शन हे अनंत व राधिकाच्या लग्नाचे सोहळे होते. अनंत व राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला शनिवारी (१३ जुलैला) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. मुंबई दौऱ्यावर असलेले मोदी या नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले होते.

५००० कोटींचे आलिशान घर, प्रायव्हेट जेट, तरीही डोक्यावर कर्ज अन्…; अनिल अंबानींपेक्षा श्रीमंत आहेत पत्नी टीना मुनीम

शुभ आशीर्वाद सोहळ्यात पंतप्रधान मोदी ईशा अंबानी व आकाश अंबानी यांच्याजवळ बसले होते. आकाशच्या शेजारी त्याची पत्नी श्लोका बसली होती. या सोहळ्यातील श्लोकाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती झोपताना दिसत आहे. कार्यक्रम सुरू असताना श्वेताला डुलकी लागलेल्याचं व्हिडीओत पाहायला मिळालं. ‘गेले काही दिवस सातत्याने सुरू असलेल्या कार्यक्रमांमुळे ती थकली असावी’, ‘या लग्नात बरेच व्हीव्हीआयपी पाहुणे झोपलेले होते’, ‘ती थकली आहे’, ‘वर्षभरापासून हे लग्न सुरू आहे’, ‘एवढे दिवस चालणारं लग्न असेल तर झोप कशी पूर्ण होईल’, अशा प्रकारच्या कमेंट्स यावर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

shloka ambani
व्हिडीओवरील कमेंट्स
shloka ambani
व्हिडीओवरील कमेंट्स

गोळधाणा सेरेमनी, एंगेजमेंट, त्यानंतर मार्च महिन्यात जामनगरमध्ये तीन दिवस पहिला प्री-वेडिंग सोहळा, जून महिन्यात इटलीत क्रूझवर तीन दिवसांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा पार पडला. या सर्व सोहळ्यांनंतर लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. जवळपास दोन आठवड्यांपासून अनंत व राधिकाच्या लग्नाआधीचे कार्यक्रम सुरू होते. अखेर रविवारी रिसेप्शन सोहळा पार पडला.

Video: बच्चन कुटुंबाच्या फोटोत सूनबाईंची गैरहजेरी; ऐश्वर्या रायला लेकीसह पाहताच रेखा पुढे आल्या अन् बिग बींच्या नातीला…

Mukesh Ambani Family Photos
मुकेश अंबानी व त्यांचे कुटुंब (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

अनंत व राधिकाच्या लग्नाला अमिताभ बच्चन व कुटुंबीय, सलमान खान, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, रणबीर कपूर व आलिया भट्ट, अजय देवगणसह अनेक बॉलीवूड व दाक्षिणात्य सेलिब्रिटी उपस्थित होते. याशिवाय युकेचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेयर व बॉरिस जॉन्सन, कार्दशियन सिस्टर्स, रॅपर रेमा, जॉन सीना, क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पंड्या अशा अनेक सेलिब्रिटींनी या लग्नाला हजेरी लावली.

Story img Loader