मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोड्यांमध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे आणि त्याची अभिनेत्री पत्नी उर्मिला कानेटकर कोठारे यांचे नाव आवर्जून घेतले जाते. अनेकांना ‘कपल गोल्स’ देणाऱ्या या जोडप्याच्या लग्नाला पाच वर्षे उलटली असून, आता लवकरच त्यांच्या घरी पाळणा हलणार आहे. उर्मिला सध्या गरोदरपणातील प्रत्येक दिवसाचा आनंद घेताना दिसतेय. नुकतेच तिचे महाराष्ट्रीय आणि पाश्चिमात्य पद्धतीने डोहाळ जेवण आणि बेबी शॉवर झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : जाणून घ्या, सिद्धार्थ-सोनाक्षीच्या ‘इत्तेफाक’ची पहिल्या दिवसाची कमाई

उर्मिलाच्या अत्यंत जवळच्या मैत्रिणी क्रांती रेडकर आणि फुलवा खामकर यांनी मिळून तिच्यासाठी ‘बेबी शॉवर’ पार्टीचे आयोजन केले होते. उर्मिला सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून, तिने या दोन्ही कार्यक्रमातील काही मजेशीर फोटो आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट केले होते. त्यानंतर आता या अभिनेत्रीने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आदिनाथ – उर्मिला एकत्र केक कापताना असताना त्यांच्या आजूबाजूला जमलेल्या सर्व अभिनेत्री ‘कोणी तरी येणार येणार गं…’ हे गाणं म्हणताना दिसतात. विशेष म्हणजे हे गाणं म्हणताना अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहण्याजोगा आहे. त्यानंतर सुकन्या तेवढ्यावरच नाही थांबल्या. तर व्हिडिओच्या शेवटी त्या ओढणीसोबत मजेशीर डान्स करतानाही दिसतात. एकंदरीत हा व्हिडिओ पाहता सर्वांनीच या पार्टीत बरीच धमाल केल्याचे दिसते.

वाचा : जाणून घ्या, ‘बाहुबली’चा सेट उभारलेल्या १०० एकर जमिनीचे आता काय झाले?

बेबी शॉवर पार्टीमध्ये गुलाबी आणि निळ्या रंगांची थीम ठेवण्यात आली होती. यावेळी उर्मिलाने पिवळ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन घातला होता. या गाऊनमध्ये उर्मिला खूप गोड दिसत होती. क्रांती रेडकर, फुलवा खामकर, भार्गवी चिरमुले, अमृता खानविलकर, सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी मोने यांच्यासह अनेक अभिनेत्री या पार्टीला उपस्थित होत्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video sukanya mone fun dance on urmila kothares baby shower party