बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या अत्यंत व्यस्त असून, कॅलिफोर्निया येथे आयोजित करण्यात आलेल्या’ प्लेन्स’ चित्रपटाच्या प्रिमिअरला हॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांबरोबर जुन्या जमान्यातील वेशभूषेत अवतरलेली प्रियांका खचितच सुंदर दिसत होती. ‘प्लेन्स’ चित्रपटाची निर्माती ‘ पिक्सर अ‍ॅन्ड वॉल्ट डिस्ने स्टुडिओ’ने केली आहे. डिस्नेचा ‘प्लेन्स’ हा चित्तथरारक चित्रपट म्हणजे एक आंतरराष्ट्रीय प्रकल्प असून, प्रियांकाने यात लक्षवेधक अशा अ‍ॅनिमेटेड रेसिंग प्लेनसाठी आपले योगदान दिले आहे. चित्रपटात प्रियांकाने आवाज दिलेली ‘इशानी’ (विमान) ही भारतीय आहे. तर, हॉलिवूड अभिनेता डॅनने ‘डस्टी चॉपरला’ आणि हॉलिवूड अभिनेत्री टेरी हॅचरने ‘डोट्टी’ ला आपला आवाज दिला आहे.
‘प्लेन्स’ चित्रपटाविषयी प्रियांका म्हणाली, हा एक आंतरराष्ट्रीय चित्रपट असून, यात जगभरातील व्यक्तीरेखा दाखविण्यात आल्या आहेत. यामुळे मुलांना ख-या अर्थाने जगातील विविध संस्कृती आणि व्यक्तींची ओळख होण्यास मदत होईल, असे वाटत असल्याचे देखील प्रियांका म्हणाली.
याशिवाय ‘क्रिश-३’ या बॉलिवूड सुपरहिरो चित्रपटात प्रियांका दिसणार आहे. ‘प्लेन्स’ चित्रपटाच्या वर्ल्ड प्रिमिअरला उपस्थिती लावल्या कारणाने ‘ क्रिश’ चित्रपटाच्या मुंबईत पार पडलेल्या ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला ती उपस्थित राहू शकली नाही.

पहा फोटो गॅलरी : हॉलिवूड चित्रपट ‘प्लेन्स’च्या प्रिमिअरमध्ये प्रियांका

प्लेन्स चित्रपटाचे दिग्दर्शन क्लाय हॉल यांचे आहे. योगायोगाने प्रियांकाचा हॉलिवूडमधील प्रवेश आणि पॉप संगीताचा पहिला प्रयत्न एकाच वेळी घडत आहे.


सौजन्य – मुव्ही ट्रेलर्स युट्युब चॅनल

Story img Loader