Urfi Javed Bedroom Secrets: सनी लिओनी, रणवीर सिंह पासून ते मसाबा गुप्ता पर्यंत अनेकांनी उर्फी जावेदच्या फॅशनला अत्यंत क्रिएटिव्ह व बोल्ड म्हंटल होतं. तर अलीकडेच चेतन भगत यांनी उर्फीवर टीका केल्याने पुन्हा उर्फी लाइमलाईटमध्ये आली होती. अलीकडेच उर्फीने Splitsvilla या शोच्या निमित्ताने आपले काही बेडरूम सिक्रेट्स सोशल मीडियावर उघड केले होते. Splitsvilla च्या निमित्ताने लोकांना कधीही बघायला न मिळालेली उर्फी दिसून येईल, आजपर्यंत फक्त जे ऑनलाईन दिसलं तेवढंच तुम्ही मला ओळखलंत पण आता मी कशी आहे हे तुम्हाला कळेल असे म्हणत उर्फीने या शो मध्ये प्रवेश घेतला होता .
Splitsvilla च्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. यामध्ये उर्फीला आपल्या बेडरूममधील आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले होते. उर्फीला असं विचारण्यात आलं की, बेडवर तुझा आवाज कमी असतो की जास्त? यावर उत्तर देताना उर्फी म्हणाली की, बेडरूमच्या गोष्टी या बेडरूममध्येच राहू द्या आणि जर तुम्हाला माझ्या बेडरूममध्ये एवढा रस असेल तर तुम्हीच माझ्या बेडवर या. उर्फीचे हे उत्तर ऐकून कमेंट बॉक्समध्ये काय झाले असणार याचा अंदाज तुम्हाला आला असेल.
उर्फी म्हणते माझ्या बेडवर..
दरम्यान काही दिवसांपूर्वी सनी लिओनीने सुद्धा उर्फीच्या कपड्यांचे खूप कौतुक केले होते. तर उर्फीने थेट सनीला, “तू माझ्याशी स्पर्धा करू शकतेस पण माझ्या कपड्यांशी स्पर्धा करू शकत नाहीस असे म्हंटले होते.” उर्फीने Splitsvilla मध्ये येण्याआधीपासूनच खूप उत्साह दाखवला होता. “मी खूप रोमँटिक आहे आणि Splitsvilla हा शो प्रेमाचा आहे त्यामुळे इथे जाण्यासाठी खूप उत्सुक आहे” असे उर्फीने सांगितले होते. या शो मध्ये गेल्यापासून उर्फीने प्रत्येक स्पर्धकाला खडेबोल सुनावले आहेत.
हे ही वाचा<< Video: तर मी प्रायव्हेट पार्ट कापून.. उर्फी जावेद भडकली; असं काही बोलून गेली की आता..
उर्फी जावेद ही सध्या बॉलिवूड किंवा मालिकाविश्वात नसूनही आघाडीच्या अभिनेत्रींना तोडीस तोड प्रसिद्ध आहे. उर्फीचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या बोल्ड फोटोंनी भरले आहे. या अकाउंटला तब्बल ३९ लाख फॉलोवर्स आहेत.