बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ‘अंतिम’ हा चित्रपट आज २६ नोव्हेंबर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. दरम्यान, सलमान खानचा बॉडीगार्ड शेरासोबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान शेरावर नाराज असल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेरासोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शेरा सलमानच्या अंतिम चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसत आहे. ‘जिस दिन इस सरदार की हटेगी ना सबकी फटेगी’ असे शेरा बोलतो आणि सलमानकडे इशारा करतो. शेराने आपल्याकडे इशारा करत डायलॉग म्हटला हे सलमानला कळते. त्यानंतर सलमान शेराकडे पाहातो आणि म्हणतो ‘आज तो ये गया.’
आणखी वाचा : शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांनीच माझ्यासोबत…; ‘गोपी बहू’ने केला धक्कादायक खुलासा

सध्या सोशल मीडियावर सलमान खान आणि शेराचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ जवळपास ५ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

‘अंतिम’ हा चित्रपट आज २६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली आहे. सलमान या चित्रपटात सरदार पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. तर आयुष एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. आता चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.