बॉलीवूडमधील एक लोकप्रिय जोडी विद्या बालन आणि इम्रान हाश्मी लवकरच त्यांच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. ‘हमारी अधुरी कहानी’ या चित्रपटात दोघे एकत्र काम करत आहेत.‘हमारी अधुरी कहानी’ची झलक (फर्स्ट लूक) नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. विद्या बालन आणि इम्रान हाश्मी यांनी या अगोदर ‘द डर्टी पिक्चर’ व ‘घनचक्कर’ या चित्रपटात काम केले होते. दोघांची जोडी प्रेक्षकांनाही पसंत पडली होती.‘एक अधुरी कहानी’ चित्रपटात विद्या बालन आणि अभिनेता राजकुमार राव हे पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्या जीवनात इम्रान हाश्मीचा प्रवेश होतो. यामुळे होणारा संघर्ष चित्रपटात दाखविण्यात आला आहे.विद्या बालन हिने २००५ मध्ये ‘परिणीता’ चित्रपटापासून तर इम्रान हाश्मीने २००४ मध्ये ‘फुटपाथ’ चित्रपटापासून बॉलीवूडमध्ये आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. इम्रानला ‘मर्डर’ चित्रपटामुळे अधिक प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर दोघांनी चित्रपटातून एकत्र काम केले. आता ‘एक अधुरी कहानी’च्या निमित्ताने दोघेही पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा