पूजा भट्ट लवकरच ‘चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती बिझी आहे. प्रमोशनच्या निमित्ताने ती अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसत आहे, अनेक मुलाखती देत आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, तिने तिच्या कारकिर्दीत तिला मिळालेल्या कौतुकाबद्दल काही गोष्टी उघड केल्या. त्यात विद्या बालनने केलेल्या कौतुकबद्दल तिने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : चर्चा रिचा चड्ढा आणि अली फजलच्या लग्नपत्रिकेची; हटके अंदाजात दिले आग्रहाचे आमंत्रण

२०२१ मध्ये, पूजाने नेटफ्लिक्स कार्यक्रम ‘बॉम्बे बेगम्स’मधून दोन दशकांनंतर अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं. लैंगिकता, कामाच्या ठिकाणी होणारा छळ, संस्थेतील राजकारण अशा बऱ्याच गोष्टींचा शोध घेणाऱ्या या कार्यक्रमात तिने बँकेच्या सीईओ राणी इराणीची भूमिका साकारली आहे. पूजाने न्यूज 18 ला सांगितले की, “विद्याने मला फोन केला आणि तिला माझं काम खूप आवडल्याचं तिने मला सांगितलं.” त्याचप्रमाणे पूजाने दिलेला किसिंग सिन विद्याला आवडल्याचं तिने पूजला सांगितलं.

पूजा म्हणाली, “एक कलाकार म्हणून माहित आहे की किसिंग सिन करणे सोपे नाही. पण तू खूप चांगलं किस केलंस.’ एका स्त्री कलाकाराकडून हे ऐकून मला खूप छान वाटललं. लोकांना आमच्याकडे बघून वाटतं की आम्ही खूप ग्लॅमरस जीवनशैली जगतो. पण ऑनस्क्रीन रोमँटिक सीन करणं खूप कठीण आहे. असे सीन शूट करताना आम्हाला अवघडल्यासारखं वाटत असतं पण स्क्रीनवर ते दिसूही द्यायचं नसतं.”

आणखी वाचा : “आवडत नसेल तर डोळे बंद करा” रणवीरच्या न्यूड फोटोशूटबद्दल प्रश्न विचारताच विद्या बालन संतापली

पूजाने १९८९ मध्ये ‘डॅडी’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तर तिच्या आगामी ‘चूप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’चे दिग्दर्शन आर बाल्की करत आहे. यात तिच्याबरोबर सनी देओल, दुलकर सलमान आणि श्रेया धन्वंतरी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट या महिन्यात २३ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidya balan gave complement to pooja bhatt for her kissing scene rnv