बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनने दिग्गज दिग्दर्शक सत्यजीत रे यांना पत्र लिहून त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असल्याचे व्यक्त केले होते. बंगाल चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे आयोजित कार्यक्रमात विद्या म्हणाली की, त्यावेळेस रे यांची प्रकृती ठीक नव्हती. मी त्यांना पत्रात लिहिले की, तुमची प्रकृती ठीक झाल्यावर मला तुमच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. मात्र, लाइफटाम ऑस्कर पुरस्कार सन्मानीत सत्यजीत रे यांचे १९९२ साली निधन झाले. त्यावेळेस विद्या शिक्षण घेत होती.
विद्याला शाळेत असल्यापासूनच चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. त्यावेळेस माधुरीचे ‘एक दो तीन’ सुपरहिट गाणे आणि शबाना आझमींच्या ‘अर्थः १९८२’ या चित्रपटातील अभिनयाने तिला मोहित केले होते. फक्त मलाच नाही तर भारतातील प्रत्येक मुलीला त्यावेळी माधुरी बनण्याची इच्छा होती, असे विद्या म्हणाली. ‘कहानी’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘पा’ यांसारखे हिट चित्रपट करणा-.या विद्याला अभिनेत्री बनण्यास शबाना आझमी यांनी प्रेरित केल्याचे तिने सांगितले.

Story img Loader