अभिनेत्री विद्या बालन ही तिच्या अभिनयासोबत तिच्या हटके स्टाइलसाठी ओळखली जाते. बऱ्याचदा विद्या कांजीवरम साड्यांमध्ये सोहळ्यांना उपस्थित राहणं पसंत करते. विद्याचा साड्यांमधील लूक चाहत्यांना नेहमीच आवडला आहे. वेगवेगळ्याय स्टाईलच्या साड्यांमध्ये विद्याला कायम स्पॉट केलं केलंय. विद्य बालनला चाहत्यांनी जास्त करून पारंपरिक कपड्यांमध्ये पाहिलं आहे. यासाठीच विद्याने एका खास लूकमध्ये चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विद्या बालनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना धक्का दिला आहे. एका टिचकीत तिने तिचं रुप बदललं आहे. विद्या बालनने शेअर केलेल्या व्हिडीओत आधी ती एका सोनेरी रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये दिसतेय. अनारकली ड्रेसमध्ये वॉक घेत ती टिचकी वाजवते आणि लगेचंच ग्लॅमरस रुपात अदाकारी दाखवताना ती दिसतेय. विद्या बालन एका काळ्या रंगाच्या बोल्ड गाऊनमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय.” हा व्हिडीओ शेअर करत विद्याने कॅप्शन मध्ये म्हंटलं आहे.” जेव्हा लोकं म्हणातात मी फक्त भारतीय कपडे परिधान करते..चटकन बघा” असं ती म्हणाली आहे.

विद्याच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळतेय. दोन्ही लूकमध्ये विद्या सुंदर दिसतेय. पहिल्या लूकमध्ये तिने गोल्डन अनारकली ड्रेस परिधान केलाय. यात तिने केसात गजरा माळला आहे. ओढणी भिरकावत ती फ्लॉन्ट करतेय. तर दुसऱ्या लूकमध्ये मोकळे केस आणि काळ्या रंगाच्या डीप नेक गाऊनमध्ये ती खूपच बोल्ड दिसतेयं.

विद्या बालन लवकरच शेरनी या सिनेमातून झळकणार आहे. मध्य प्रदेशमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. अमित मासुरकर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.