आगामी ‘घनचक्कर’ या चित्रपटात विद्या बालन एका बोल्ड पंजाबी पत्नीची भूमिका करत असून सध्या ती चित्रपटाच्या प्रसिध्दीमध्ये व्यस्त आहे. याचाच एक भाग म्हणून तिने ‘डांस इंडिया डांस – सुपर मॉम’ या टीव्ही ‘रिअॅलिटी शो’ मधे उपस्थिती लावली होती. विद्या बालनने मिथुन चक्रवर्ती सोबत नृत्य करून खूप धमाल मस्ती केली.
मोठ्या पडद्यावर सशक्त आणि स्वतंत्र महिलांच्या भूमिका साकारून स्वत:चा वेगळा ठसा उमटवणा-या विद्या बालनने सांगितले, जरी घनचक्कर चित्रपटात मी मुख्य भूमिका करत नसले, तरी याचे मला वाईट वाटत नाही. राजकुमार गुप्ता दिग्दर्शित घनचक्कर चित्रपटात विद्या बालन एका आनंदी गृहिणीची भूमिका करत आहे.
विद्या म्हणाली, घनच्चकर चित्रपटात मुख्य भूमिकेत नसल्याचा मला आनंद आहे. या आधी अनेक चित्रपटात मी मुख्य भूमिका केल्या आहे. हा चित्रपट इमरानचा असून यात त्याची मुख्य भूमिका आहे. चित्रपटात माझ्या वाट्याला आलेली भूमिका करून मी खूप आनंदी आहे. मी कोणत्याही दबावाखाली अभिनय करत नाही.  
‘पा’, ‘इश्किया’, ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘कहानी’ सारख्या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी विद्या बालन सर्वांना परिचित आहे.

Story img Loader