राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात आज(सोमवारी) बॉलीवूड कलाकार विद्या बालन आणि कमल यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. पद्मश्री पुरस्कार स्विकारताना मला स्वत:चा खूप अभिमान वाटत असल्याचे विद्या बालनने सांगितले. तसेच या पुरस्कारामुळे मी अतिश्य आनंदी असून पुरस्कार मिळाल्यानंतरच्या भावना शब्दांत मांडता येणा-या नसल्याचे विद्याने सांगितले. विद्या बालनने आजपर्यंत ‘पा’, ‘इश्कियाँ’, ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘कहानी’ यांसारख्या हिंदी चित्रपटांतून सशक्त स्त्री-भूमिका पडद्यावर साकारल्या आहेत.
यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनासुद्धा पद्मश्री राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना कमल हसन यांनी एक भारतीय म्हणून आपल्याला अभिमान वाटत असल्याचे सांगितले. तसेच या पुरस्कारामुळे येणा-या काळात अधिकाधिक चांगले काम करण्यास आपल्याला प्रोत्साहन मिळणार असल्याचे कमल हसन यांनी सांगितले. 

Story img Loader