अभिनेत्री विद्या बालनने तिच्या आगामी ‘बॉबी जासूस’ या चित्रपटाच्या ब्लॉगचे याच चित्रपटाची निर्माती-अभिनेत्री दिया मिर्झासोबत अनावरण केले. या ब्लॉगचे नाव ‘बॉबी को सब मालूम है’ असे ठेवण्यात आले आहे. या ब्लॉगवर काही बॉलीवूड बातम्या आणि गॉसिप्स टाकण्यात आले आहेत.    
३६वर्षीय विद्याने या चित्रपटात महिला गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. विद्यासोबत फुकरे चित्रपटातील अभिनेता अली फझलनेही महत्वाची भूमिका साकारली आहे. समर शेख दिग्दर्शित आणि दिया मिर्झा निर्मित ‘बॉबी जासूस’ ४ जुलैला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Story img Loader