‘इश्किया’, ‘द डर्ट्री पिक्चर’ आणि ‘कहानी’ या चित्रपटानंतर कलाविश्वामध्ये अभिनेत्री विद्या बालन हिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटात विद्याचा अभिनय पाहून सर्वजण थक्क झाले. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी विद्या बालननं भरपूर वजन वाढलं होतं. त्यानंतर तिचं वाढलेलं वजन हा चर्चेचा विषय ठरला होता. यावर विद्याला बऱ्याच वेळा ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र, आता विद्याने या गोष्टीवर वक्तव्य केलं आहे. विद्या म्हणाली की, एक काळ असा होता की जेव्हा ती स्वत: तिच्या शरीराचा तिरस्कार करायची, कारण ती या सगळ्या गोष्टी मान्य करू शकतं नाही.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, “मी जे केले त्यामधून जाणे माझ्यासाठी महत्वाचे होते. या सगळ्यागोष्टी सार्वजनिक होत्या आणि अपमानास्पद होत्या. माझ्या कुटूंबातील कोणतीही व्यक्ती चित्रपटसृष्टीत नाही. त्यावेळी मला हे सगळं काही दिवसांत थांबेल हे सांगणार कोणी नव्हतं. माझ्या वजनाचा मुद्दा हा एक राष्ट्रीय मुद्दा बनला होता.” असं विद्या म्हणाली.
पुढे ती म्हणाली,”मी आधीपासूनच एक लठ्ठ मुलगी आहे. मी असं बोलणार नाही की, माझे वाढते वजन मला त्रास देत नाही. परंतु मी आता खूप पुढे आली आहे. मला आधीपासून हार्मोनल बॅलेन्सची समस्या आहे. बरेचं दिवस मी माझ्या शरीराचा तिरस्कार केला. मला असं वाटलं की माझं शरीर मला धोका देतं आहे. ज्या दिवशी माझ्यावर सर्वात चांगलं दिसण्याचा दबाव होता, तेव्हाच माझं वजन वाढत होतं. हे पाहून मी आणखी नैराश्यात जात होते. मात्र शेवटी मी ही गोष्ट मान्य केली. पण यासाठी मला बराच वेळ लागला.”
दरम्यान, विद्या आज कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘इश्किया’, ‘द डर्ट्री पिक्चर’,‘कहानी’, मिशन मंगल, शकुंतलादेवी अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं असून तिच्या भूमिका गाजल्या आहेत.