डिटेक्टिव विद्या.. अहो, गोंधळू नका. बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनने काही खरोखर डिटेक्टीवगिरी सुरु केलेली नाही. ख-या जीवनात तर नाही पण चित्रपटात ती जासूसी करणार आहे. ‘बॉबी जासूस’ या चित्रपटात विद्या डिटेक्टिवच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘बॉबी जासूस’ या चित्रपटाची निर्मिती दिया मिर्झा आणि साहिल सांघा यांच्या बॉर्न फ्री एन्टरटेन्मेंट निर्मिती संस्थेअंतर्गत करण्यात येणार आहे. तर, चित्रपटाची कथा संयुक्ता चावलाची असून, समर शेख याचे दिग्दर्श करणार आहे.
विद्याप्रमाणेच ‘जग्गा जासूस’मध्ये रणबीर कपूर आणि ‘ब्योमकेश बक्शी’मध्ये सुशांत सिंग राजपूत डिटेक्टीवच्या भूमिकेत झळकणार आहेत.

Story img Loader