अभिनयविश्वात घडून गेलेल्या एखाद्या दिग्गज कलाकाराची भूमिका साकारणे हे आजच्या घडीच्या प्रत्येक कलाकाराचे स्वप्नचं…हेच स्वप्न सत्यात उतरले आहे बॉलीवूडची दिवा विद्या बालन हिच्यासाठी…आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत नाव कमावणारी ही अभिनेत्री तिच्या मराठी पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीला बऱ्याच गोष्टी बहाल करणारे भगवान दादा यांचा जीवनपट येत्या 24 जूनला आपल्यासमोर उलगडणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन ज्येष्ठ अभिनेत्री गीता बाली यांची भूमिका साकारत आहे.
चित्रपटातला विद्या बालनचा लूक आऊट झाला आणि खरचं गीता बाली पुन्हा अवतरली की काय? असा भास सगळ्यांनाच झाला. प्रेक्षकांना हा सुखद धक्का देण्याचे श्रेय मेक-अप आर्टीस्ट विद्याधर भट्टे आणि या चित्रपटाच्या वेशभूषाकार सुबर्णा राय चौधरी यांना जाते.
यासंदर्भात बोलताना मेक-अप आर्टीस्ट विद्याधर म्हणाले, “चित्रपटात दिसणाऱ्या केशरचनेपूर्वी मी सहा – सात विग्स वापरून पाहिल्या शिवाय 10 केशरचनांचे ट्रायल्स झाले आणि अखेर गीता बाली आणिविद्या यांत साम्य दाखवणारी केशरचना मला मिळाली.”या चित्रपटाविषयी पुढे बोलताना ते म्हणाले, “हिंदी सिनेसृष्टीत स्थिरावलेली अभिनेत्री विद्या हिला एखादा चांगला मराठी चित्रपट करण्याची बरेच दिवस इच्छा होती. मी या चित्रपटासंदर्भात बोलण्यासाठी तिला फोन केला तेव्हा ती कोचीनमध्ये होती. ती तिथून आल्यावर या चित्रपटाची कथा आम्ही तिला ऐकवली आणि ताबडतोब तिने या चित्रपटासाठी आपला होकार कळवला.
दरम्यान विद्याधर यांना प्रेक्षकांसमोर विद्याचा नॅचरल लूक आणायचा होता. याबाबत बोलताना,‘विद्याने कधीही माझ्या कामात दखल दिली नसल्याचे’ विद्याधर यांनी म्हटले. काळ बदलतो तशी स्टाइलही बदलत जाते. आज असणारी कपड्यांची स्टाइल १९५० च्या दशकांत फार वेगळी होती. आजच्या काळात तसाच लूक डिझाइन करणे हे डिझायनर्ससाठी एक मोठे आव्हान होते. हे आव्हान लिलया पेलले या चित्रपटाच्या डिझायनर सुबर्णा राय चौधरी यांनी…त्यांनी या आव्हानात्मक कामाचा अवघ्या सहा दिवसांत फडशा पाडला. चित्रपटाच्या कॉस्च्युम डिझायनिंग विषयी बोलताना त्या म्हणाल्या, ‘निर्मितीसंस्थेने खूप विश्वासाने हे काम माझ्याकडे सोपवले होते. विद्या बालन पडद्यावर गीता बाली दिसावी यासाठी सुबर्णा यांनी त्या काळातल्या ड्रेसेस चा अभ्यास केला…चित्रपटाचा काळ उभारणे हे मोठे कसब होते मात्र आम्ही त्या काळातल्या ड्रेसेसेबरोबरच, दागिन्यांचा अभ्यास करून एक संपूर्ण लूक डिझाइन केल्याचे त्या म्हणाल्या.
.. अशी झाली विद्या बालनची गीता बाली
विद्याने कधीही माझ्या कामात दखल दिली नाही.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-05-2016 at 11:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidya balan transformation for ekk albela