सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण आपलाच विचार करतो. आपले शिक्षण, आपली नोकरी, आपला संसार आणि आपली मुले. यापुढे जाऊन गरजू व्यक्तीला मदत करावी हा विचार तसा अनेकांच्या मनात येतो पण तसे प्रत्येकजण करतोच असे नाही. दुर्गा देवी सिंग मात्र याला अपवाद ठरली आहे.
लैंगिक शोषण या महत्त्वपूर्ण विषयाला कहानी २ च्या माध्यमातून दिग्दर्शक सुजॉय घोषने समोर आणले आहे. अगदी अनपेक्षितरित्या हा विषय समोर येतो. लहान वयात मुलांचे होणारे लैंगिक शोषण आणि त्याचा त्या मुलांवर होणारा परिणाम अगदी सुरेखरित्या या सिनेमात मांडण्यात आला आहे.
‘कहानी’ या सिनेमाचा हा सिक्वल असल्यामुळे आधीच्या विषयाप्रमाणेच काहीसा या भागाचाही विषय असेल असे अनेकांना वाटते. पण सिनेमा सुरु झाल्यानंतर मात्र जुन्या सिनेमाचा दुसऱ्या भागाशी काही संबंध नाही हे कळून येते. त्यामुळे कोणी पहिला ‘कहानी’ पाहिला नसेल तोही हा सिनेमा पाहायला कोऱ्या पाटीने नक्कीच जाऊ शकतो. चित्रपटगृहातून निघताना मात्र त्याची पाटी कोरीच राहणार नाही याची खात्री दिग्दर्शक सुजॉय घोषने घेतली आहे.
या सिनेमाचा हुकमी एक्का म्हणजे विद्या बालन. संपूर्ण सिनेमात ती क्षणभरही प्रेक्षकांचे लक्ष विचलित होऊ देत नाही. तिची गोष्ट जाणून घेण्यासाठीची अगतिकता आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची तळमळ सिनेमात सतत जाणवत राहते. सिनेमाचा पहिला भाग प्रेक्षकांना पूर्णपणे बांधून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. मध्यांतरानंतर सिनेमा हळू हळू कळायला लागतो असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. ‘कहानी’मध्ये शेवटपर्यंत ताणली गेलेली उत्कंठा मात्र ‘कहानी २’ मध्ये दिसत नाही. असे असले तरी सिनेमा आपली पकड कुठेच सोडत नाही.
या संपूर्ण सिनेमात जुगल हंसराजची व्यक्तिरेखा लक्षात राहणारी आहे. लैंगिक शोषण करणाऱ्या काकाची भूमिका त्याने चोख बजावली आहे. आपण जे करत आहोत ते योग्य आहे असे त्याला वाटत असते. या त्याच्या क्रूरकर्मात त्याची आईही तेवढीच साथ देते. यातूनच समाजाची मानसिकता बदलण्याची अजून किती गरज आहे हे दाखवण्यात आले आहे. लैंगिक शोषण होणाऱ्या मुलीला आपल्या काकापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्या सिन्हाला म्हणजेच दुर्गा राणी सिंगला कोणकोणत्या गोष्टीला सामोरे जावे लागते हे पाहण्यासाठी एकदा तरी ‘कहानी २’ पाहावाच.
सिनेमाची एकंदरीत भट्टी चांगली जुळून आली आहे. काही काही सीन चित्रित नसते केले तरीही चालले असते असे वाटते. पण ते तेवढ्याच पूरता. सिनेमाचे संकलन ही अजून एक जमेची बाजू आहे. उत्कृष्ट संकलनामुळे सिनेमा बघताना कुठेही लक्ष विचलीत होत नाही. अर्जुन रामपालनेही आपली भूमिका चांगल्याप्रकारे वठवली आहे. पण सिनेमागृहातून बाहेर पडताना लक्षात राहते ती दुर्गा राणी सिंगच.
दिग्दर्शकः सुजॉय घोष
निर्मातेः सुजॉय घोष, जयंतीलाल गाढा
प्रस्तुतकर्तेः पेन इंडिया लिमिटेड
कलाकारः विद्या बालन, अर्जुन रामपाल. जुगल हंसराज, नाएशा खन्ना, कौशिक सेन
संगीतकारः क्लिंटन सेरेजो
मधुरा नेरूरकर
ट्विटरः @MadhuraNerurkar
madhura.nerurkar@indianexpress.com