घनचक्कर’ अभिनेता इमरान हाश्मीसोबत अधिकाधिक चित्रपट करण्याची इच्छा आज (सोमवार) विद्या बालनने व्यक्त केली. इमरानसोबत ‘घनचक्कर’मध्ये काम करण्याचा अनुभव रोमांचक होता. मला आशा आहे की अजूनही काही दिग्दर्शक आम्हा दोघांना एकत्र घेऊन चित्रपट करतील. तसेच, चित्रपटातील आमच्या दोघांची केमिस्ट्री बघता दिग्दर्शक राजकुमार गुप्ता आणखीन काही चित्रपट आमच्यासोबत करतील, असे विद्या बालनने चित्रपटाची प्रसिद्धी करताना म्हटले.
‘द डर्टी पिक्चर’ नंतर इमरानबरोबर इतक्या लवकर कोणताही चित्रपट करेन असा विचार विद्याने केला नव्हता. ‘घनचक्कर’ हा एक वेगळा चित्रपट आहे आणि दोघांनीही अशा प्रकारची भूमिका यापूर्वी केली नसल्याचे तिने सांगितले. विद्याने सदर चित्रपटात नीतू अथरे (मिसेस घनचक्कर) ची भूमिका केली आहे.
‘घनचक्कर’ २८ जूनला चित्रपटगृहात दाखल होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा