दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे सध्या सिनेसृष्टीत सक्रिय नसले तरी ते त्यांच्या खास ट्वीटसाठी आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. गेली काही वर्षं ते चित्रपटापासून दूर असले तरी या या क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींवर ते अधून मधून टीका टिप्पणी करत असतात. मध्यंतरी त्यांनी बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर टीका केली होती. टायगर हा पुरुष नसून एक स्त्री आहे अशा अपमानजनक शब्दांत राम गोपाल वर्मा यांनी खिल्ली उडवली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१७ मध्ये त्यांनी अभिनेता विद्युत जामवालची आणि त्याच्या कामाची फोनकरून प्रशंसा केली आणि त्याला खूप शुभेच्छा दिल्या. याच कॉलमध्ये राम गोपाल वर्मा यांनी पुन्हा टायगर श्रॉफवर असभ्य भाषेत टीका केली होती. हा फोन कॉल विद्युतने रेकॉर्ड केला होता आणि त्याने हे रेकॉर्डिंग ऑनलाईन अपलोड करून यासंदर्भात ट्वीट केलं होतं. त्यावेळी हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. सोशल मीडियावर विद्युतला लोकांनी चांगलंच ट्रोल केलं होतं.

आणखी वाचा : बॉयकॉट ट्रेंड असो वा आणखी काही, शाहरुखचा ‘जवान’ प्रदर्शनाआधीच ठरला सूपरहीट; कमावला एवढा नफा

“विद्युत तू एक सर्वोत्कृष्ट पुरुष आहे टायगर हा एक सर्वोत्कृष्ट महिला आहे. तुमच्यात बराच फरक आहे, तू त्याच्यापेक्षा सरस आहेस” अशा पद्धतीचं वक्तव्यं राम गोपाल वर्मा यांनी या फोन कॉलमध्ये केलं होतं. आधी विद्युतने ही गोष्ट मस्करीमध्ये घेतली, पण नंतर मात्र यामागचं गांभीर्य समजून त्याने त्याची बाजूदेखील मांडली. राम गोपाल वर्मा हे दारूच्या नशेत असल्याचंही विद्युतने स्पष्ट केलं होतं. त्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी विद्युत आणि टायगर या दोघांची माफीदेखील मागितली होती.

टायगर श्रॉफला या सगळया प्रकाराबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्याने अत्यंत संयमी उत्तर दिलं. पीटीआयला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये टायगर म्हणाला होता की, “राम गोपाल वर्मा हे बरेच अनुभवी आणि ज्येष्ठ दिग्दर्शक आहेत. मी नुकताच या क्षेत्रात आलो आहे. माझ्या मनात जे आहे ते मी आत्ता बोललो तर ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे या मुद्द्यावर भाष्य करून मला माझ्या कुटुंबाला अडचणीत टाकायचं नाही.” टायगरचा नुकताच ‘हीरोपंती २’ प्रदर्शित झाला होता, आता तो क्रीती सनोनबरोबर ‘गणपत’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidyut jammwal leaked conversation with ram gopal varma using derogatory words for tiger shroff avn