टी.वी.मालिका आणि चित्रपट कलाकार विजय जी.बदलानी यांच्या तीन मालिका विविध वाहीन्यांवर सध्या प्रसारित होत आहेत. ‘जोधा अकरबर’ मध्ये ‘तानसेन’, ‘बाल गोपाल करे धमाल’ मध्ये ‘कंस’ आणि ‘यम है हम’ मध्ये ‘नारद’ ची भूमिका ते करीत आहेत. आता त्यांनी लाईफ ओके वाहिनीवरील गुन्हेगारी विश्वावर आधारीत मालिका ‘सावधान इंडिया’ च्या ‘ईद स्पेशल’ भागांचे चित्रीकरण पूर्ण केले असून, याचे ईद च्या दिवशी होणार आहे.

‘सावधान इंडिया’ च्या ‘ईद स्पेशल’ भागात एका श्रीमंत मुस्लिम कुटुंबातील मुलगा फरहान (विजय बदलानी) याची गोष्ट दाखविण्यात आली आहे. ज्याचा निकाह मेहर (मालिनी कपूर) हीच्या सोबत झाला आहे आणि लग्नाला अनेक वर्षे उलटूनही त्यांना मुल नाही. बायकोच्या हट्टामुळे संततीसाठी फरहान एका गरीब मुलीसोबत हुस्ना (रिद्धिमा तिवारी) सोबत दुसरे लग्न करतो आणि ती घरात आल्यानंतर कशा प्रकारे आपला अंदाज दाखवते यावर आधारित हा भाग आहे.
यावर विजय बदलानी म्हणतात “मी सावधान इंडिया” मध्ये खूप काम केले आहे. पण त्याचा हा  ‘र्इद स्पेशल’ भाग खूपच भावनात्मक आहे. हा लोकांच्या मनात नक्कीच घर करेल. माझ्या तीन मालिका सध्या विविध टी वी चैनेलवर प्रसारित होत आहे. ज्याला लोकांची खूपच पसंती मिळत आहे आणि हा भाग त्या सर्वांपासून खूपच वेगळा आहे. मालिनी आणि रिद्धिमा सोबत काम करताना खूप चांगले वाटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा