रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याच्या सध्या जोरदार चर्चा आहेत. हे दोघेही फेब्रुवारी महिन्यात नात्याची अधिकृत घोषणा करून साखरपुडा करणार आहेत, असं म्हटलं जात होतं. खरं तर या दोघांच्या साखरपुड्याच्या या चर्चा पहिल्यांदाच झालेल्या नाही, यापूर्वी अनेकदा त्यांच्या नात्याबद्दल चर्चा होत असतात. पण आता स्वतः विजय देवरकोंडाने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजयने त्याच्या व रश्मिकाच्या साखरपुड्याच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. ‘लाइफस्टाइल एशिया’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता विजय देवरकोंडाने रश्मिका मंदानासोबत साखरपुडा किंवा लग्न करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. “मी फेब्रुवारीमध्ये साखरपुडा किंवा लग्न करणार नाहीये. माझ्या साखरपुड्याच्या व लग्नाच्या अफवा मी दरवर्षी ऐकत असतो. माध्यमं दर दोन वर्षांनी माझं लग्न लावत असतात. ते फक्त माझ्या लग्नाची वाट पाहत आहेत,” असं विजय या मुलाखतीत म्हणाला.

२१.२ मिलियन प्रेक्षकांनी २०२३ मध्ये ओटीटीवर सर्वाधिक पाहिला ‘हा’ वादग्रस्त बॉलीवूड चित्रपट; तुम्ही बघितलाय का?

विजय व रश्मिका यांच्या अफेअरची चर्चा कायमच होते, पण हे दोघे आपण फक्त मित्र असल्याचं सांगतात. रश्मिका व विजयने ‘गीता गोविंदम’, ‘डिअर कॉम्रेड’ अशा रोमँटिक तेलुगू चित्रपटात एकत्र काम केलं आहे. या दोघांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

डॉन अबू सालेमशी अफेअर पडलेलं महागात, तुरुंगवास भोगावा लागला अन् करिअरही संपलं; आता काय करते अभिनेत्री मोनिका बेदी

रश्मिका मंदानाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती नुकतीच रणबीर कपूर स्टारर ‘अॅनिमल’ चित्रपटात झळकली होती. त्यानंतर ती व्हिएतनामला फिरायला गेली होती. तिचे या व्हेकेशनचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर विजयने काही फोटो पोस्ट केले होते. त्यावरून दोघेही एकत्र व्हिएतनामला फिरायला गेल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चा होऊ लागल्या. पण विजयने या निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट केलंय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay devarakonda reaction on engagement rumors with rashmika mandanna in fabuary hrc