बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि दाक्षिणात्य स्टार विजय देवरकोंडा यांचा ‘लायगर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या कार्यक्रमाला विजय आणि अनन्या दोघांनीही हजेरी लावली होती. यावेळी ट्रेलरपेक्षा जास्त चर्चा विजय देवरकोंडाच्या साधेपणाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. विजय या कार्यक्रमाला साधी चप्पल घालून पोहोचला होता. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच चर्चेत होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या नावाची चर्चा आहे.

विजय देवरकोंडा आणि अनन्या सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘लायगर’चं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. अशातच मुंबईच्या वांद्रे परिसरानंतर आता अनन्या आणि विजय देवरकोंडा यांना मुंबई लोकलमधून प्रवास करताना पाहिलं गेलं आहे. स्टार कलाकार नेहमीच त्यांच्या स्वतःच्या कारमधून प्रवास करताना दिसतात. त्यामुळे लोकलमधून प्रवास करणाऱ्या विजय देवरकोंडाच्या साधेपणाचं कौतुक होताना दिसत आहे. विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Chinese tourist fell down from train
‘सेल्फी’साठी तरुणी ट्रेन बाहेर डोकावताच झाडाला आदळली अन्…; पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही, पाहा अपघाताचा थरारक VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Female Chinese Tourist Miraculously Survives After Falling From Running Train In Colombo Chilling Videos
धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात उभी होती तरुणी, अचानक पाय सटकला अन्…. थरारक घटनेचा Video Viral
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Shocking video Angry Hippopotamus Attacks Tourists At A Jungle Safari Animal Video Viral
सिंह-वाघापेक्षाही खतरनाक पाणघोड्याच्या नादाला लागले; जवळ जाताच केला खतरनाक हल्ला, VIDEO चा शेवट पाहून थरकाप उडेल
confusion among passengers after badlapur local departing from thane replaced with csmt local train
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ; अचानक मुंबई दिशेकडे जाणारी लोकल लावल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच

आणखी वाचा- दारु, सेक्स अन् लव्ह बाइट्स… खासगी आयुष्याबद्दल विजय देवरकोंडाचे धक्कादायक खुलासे

व्हिडीओमध्ये अनन्या आणि विजय देवरकोंडा ट्रेनसाठी प्लॅटफॉर्मवर जाताना आणि त्यानंतर प्लॅटफॉर्मवर बसून ट्रेनची वाट पाहताना दिसत आहेत. पुढे दोघंही लोकलमधून प्रवास करतानाही दिसत आहेत. याशिवाय अनन्या पांडेनं लोकल प्रवासाचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. विजय देवरकोंडाच्या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. विजय मुळचा मुंबईचा नसल्याने हा त्याच्यासाठी हा नवा अनुभव असू शकतो असं बोललं जात आहे. तसेच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विजयचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

दरम्यान अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांचा ‘लायगर’ चित्रपट २५ ऑगस्ट २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदीसह तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनन्या आणि विजयने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्येही हजेरी लावली होती. या शोमध्ये दोघांनीही खासगी आयुष्याबाबत बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत.

Story img Loader