बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांचा ‘लायगर’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नाही. अनन्याची या चित्रपटामधील भूमिका पाहून नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली. शिवाय ‘आयएमडीबी’ या साईटने जाहीर केलेल्या यादीनुसार धर्मा प्रोडक्शनचा ‘लायगर’ हा सर्वात कमी कमाई करणारा चित्रपट ठरला. हे नुकसान भरून काढण्यासाठी विजय आणि लायगर चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

आणखी वाचा : ‘…..आणि माझ्या आईने मला मारले,’ अमिताभ बच्चन यांनी सांगितली बालपणीची आठवण

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळत होता. १२० कोटी रुपयांचं बजेट असलेला लायगर बॉक्स ऑफिसवर ४० कोटी रुपयांच्या आसपासच गल्ला जमवू शकला. हा चित्रपट अयशस्वी ठरल्यामुळे निर्मात्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ‘लायगर’ चित्रपट इतक्या मोठ्या प्रमाणात अपयशी ठरल्यानंतर या चित्रपटाशी निगडित सर्वांनाच धक्का बसला आहे.

‘लायगर’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असतानाच ‘जन गण मन’ चित्रपटाची कथा विजयला ऐकवण्यात आली होती. त्याला ती कथा आवडल्याने हा चित्रपट करायला त्याने होकार दिला. या चित्रपटाचे दिग्दर्शनही पुरी जगन्नाथ करणार आहेत. पण आता ‘लायगर’ बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरल्यामुळे ‘जन गण मन’च्या निर्मात्यांनाच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळेच विजय देवरकोंडा आणि पुरी जगन्नाथ यांनी निर्मात्यांचे नुकसान भरून काढण्याचा निर्णय आहे. ते भरून लढण्यासाठी विजय देवरकोंडा आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथ ‘जन गण मन’ चित्रपटासाठी मानधन न घेण्याचे ठरविले आहे. परंतु अद्याप त्यांनी याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.

हेही वाचा : विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ ठरला आयएमडीबी साईटवर सर्वात कमी रेटिंग्स मिळवणारा चित्रपट

‘लायगर’च्या अपयशानंतर ‘जन गण मन’ चित्रपटाचे बजेट कमी करून ते जवळपास निम्म्यावर आणण्यात आले आहे. इतकंच नाही तर चित्रपटाच्या कथानकावरही पुन्हा विचार केला जात आहे. ‘जन गण मन’ या चित्रपटाची निर्मितीही करण जोहरची असून हा चित्रपट ३ ऑगस्ट २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. हा चित्रपट हिंदीबरोबरच कन्नड, तमिळ, मल्याळम आणि तेलुगु भाषांत प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader