साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करतो. ‘गीता गोविंदा’ आणि ‘डिअर क्रॉम्रेड’मधील त्याच्या भूमिका खूप गाजल्या. त्याचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. भारताबाहेर त्याचे करोडो चाहते आहेत. विजय आणि साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदाना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र, विजय देवरकोंडाने आता सोशल मीडियावर आपल्या आवडत्या मुलीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. मात्र, ही मुलगी रश्मिका मंदाना नसून दुसरीच आहे. विजय आणि त्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा- गरोदरपणाची घोषणा केल्यानंतर इलियाना डिक्रूजने पहिल्यांदाच शेअर केला बॉयफ्रेण्डबरोबरचा फोटो, म्हणाली…

trp of marathi television channel colors marathi trp down
Bigg Boss संपताच कलर्स मराठीचा TRP घसरला! दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली ‘ही’ वाहिनी, तर रितेशमुळे ग्रँड फिनाले ठरला…
shraddha kapoor at screen event
‘द इंडियन एक्स्प्रेस’चे SCREEN मॅगझिन श्रद्धा कपूरच्या हस्ते…
Marathi Actor Milind Gawali Share memories of atul parchure
“अतुलची कमी कधीही भरून काढता येणार नाही”, अतुल परचुरेंच्या आठवणीत मिलिंद गवळी भावुक; पोस्ट करत म्हणाले, “तो हतबल झाला…”
remo d souza fraud
रेमो डिसोजा, पोलीस कर्मचार्‍यासह ७ आरोपी; डान्स ग्रुपच्या तरुणांची १२ कोटींची फसवणूक
Rinku rajguru childhood photo with father
फोटोतील मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का? जगभरात ११० कोटी रुपये कमावणाऱ्या सिनेमात केलंय काम
Bigg Boss 18 hrithik roshan life coach Sara Arfeen Khan opens up about giving birth to her twins after two miscarriages
Bigg Boss 18: हृतिक रोशनची लाइफ कोच सारा अरफीन खान भडकली, स्वतःला मारत म्हणाली, “दोन वेळा गर्भपात अन्… “
Aishwarya Rai Bachchan Bodyguard Salary
ऐश्वर्या राय बच्चनच्या बॉडीगार्डचा पगार किती? जाणून घ्या
Salman Khan was pulled over by a traffic cop who didn't recognise him.
Salman Khan Rash Driving : “मी सलमान खान आहे”, म्हणत दबंग खानने चालवली होती फूटपाथवर गाडी, पोलिसांनी थांबवल्यावर…; सहकलाकाराने सांगितला जुना किस्सा!
Suraj Chavan Gautami Patil Video
‘झापूक झुपूक’ सूरज चव्हाण अन् गौतमी पाटीलची भेट, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “भावाने मार्केट जाम केलंय”

विजय देवरकोंडाने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विजय समंथा रुथ प्रभूबरोबर दिसत आहे. विजयने फोटोला कॅप्शन दिले आहे. ‘माझी आवडती मुलगी.’ या फोटोमध्ये विजय समंथाबरोबर अतिशय आरामदायक लूकमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये दोघे एका आलिशान हॉटेलमध्ये जेवण करताना दिसत आहेत. सुरुवातीला हा फोटो समंथाने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला होता. त्यानंतर विजय देवरकोंडाने हा फोटो पुन्हा शेअर केला आहे.

समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांच्यात चांगली मैत्री आहे. काही दिवसांपूर्वीच विजय देवरकोंडाचा वाढदिवस झाला. या वाढदिवसानिमित्त समंथाने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने माझा आवडता स्टार असं म्हणत विजयला शुभेच्छा दिल्या होत्या. दोघांच्या वर्क्रफंटबाबत बोलायचं झालं तर विजय आणि समंथाचा ‘खुशी’ चित्रपट १ स्पप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. विजय आणि समंथा सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.