साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करतो. ‘गीता गोविंदा’ आणि ‘डिअर क्रॉम्रेड’मधील त्याच्या भूमिका खूप गाजल्या. त्याचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. भारताबाहेर त्याचे करोडो चाहते आहेत. विजय आणि साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदाना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र, विजय देवरकोंडाने आता सोशल मीडियावर आपल्या आवडत्या मुलीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. मात्र, ही मुलगी रश्मिका मंदाना नसून दुसरीच आहे. विजय आणि त्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चांना उधाण आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- गरोदरपणाची घोषणा केल्यानंतर इलियाना डिक्रूजने पहिल्यांदाच शेअर केला बॉयफ्रेण्डबरोबरचा फोटो, म्हणाली…

विजय देवरकोंडाने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विजय समंथा रुथ प्रभूबरोबर दिसत आहे. विजयने फोटोला कॅप्शन दिले आहे. ‘माझी आवडती मुलगी.’ या फोटोमध्ये विजय समंथाबरोबर अतिशय आरामदायक लूकमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये दोघे एका आलिशान हॉटेलमध्ये जेवण करताना दिसत आहेत. सुरुवातीला हा फोटो समंथाने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला होता. त्यानंतर विजय देवरकोंडाने हा फोटो पुन्हा शेअर केला आहे.

समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांच्यात चांगली मैत्री आहे. काही दिवसांपूर्वीच विजय देवरकोंडाचा वाढदिवस झाला. या वाढदिवसानिमित्त समंथाने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने माझा आवडता स्टार असं म्हणत विजयला शुभेच्छा दिल्या होत्या. दोघांच्या वर्क्रफंटबाबत बोलायचं झालं तर विजय आणि समंथाचा ‘खुशी’ चित्रपट १ स्पप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. विजय आणि समंथा सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.