बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांच्या ‘लायगर’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अखेरीस हा चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. बॉयकॉट ट्रेंडमुळे चित्रपटाला फटका बसणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. प्रत्यक्षात मात्र असंच काहीसं घडताना दिसत आहे. अनन्याची या चित्रपटामधील भूमिका पाहून नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही फ्लॉप ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – “अनन्या पांडेला ऑस्कर द्या” ‘लायगर’मधील अभिनेत्रीचं काम पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मजेशीर मीम्स व्हायरल
‘लायगर’ चित्रपटाचा ट्रेलर, विजय देवरकोंडाचा लूक पाहून चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. विजयसह अनन्या देखील या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देशभरात फिरली. मात्र जोरदार प्रमोशन करूनही चित्रपट मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. २५ ऑगस्टला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जगभरात ‘लायगर’ने ३३ कोटी १२ लाख रुपये कमाई केली.
तर प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी मात्र हा आकडा पूर्णपणे घसरला. बॉक्स ऑफिस इंडियाच्या वृत्तानुसार, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी फक्त १६ कोटी रुपये कमाई केली. म्हणजेच प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसाच्या तुलनेमध्ये दुपटीने दुसऱ्या दिवशी ‘लायगर’चा बॉक्स ऑफिस कलेक्शनचा आकडा घसरला आहे. शनिवारी तर फक्त ७ कोटी रुपये या चित्रपटाने कमावले. आता विकेण्डला या चित्रपटाला प्रेक्षकांचा अधिक प्रतिसाद मिळेल आणि चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्येही वाढ होईल असं बोललं जात आहे.
आणखी वाचा – Liger Movie Review : ना धड लायन, ना टायगर; जबरदस्ती जुळवून आणलेला अन् एक फिस्कटलेला प्रयोग म्हणजे ‘लाइगर’
दरम्यान अनन्या आणि विजय देवरकोंडा यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘लायगर’ चित्रपटाकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्येही प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केलं असून निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची आहे.