बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांच्या ‘लायगर’ (Liger) चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अखेरीस हा चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. बॉयकॉट ट्रेंडमुळे चित्रपटाला फटका बसणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. प्रत्यक्षात मात्र असंच काहीसं घडताना दिसत आहे. अनन्याची या चित्रपटामधील भूमिका पाहून नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – विजय देवरकोंडाच्या ‘लायगर’ला ‘बॉयकॉट’ ट्रेंडची भीती? प्रदर्शनापूर्वीच निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

‘लायगर’ चित्रपटाचा ट्रेलर, विजय देवरकोंडाचा लूक पाहून चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. विजयसह अनन्या देखील या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देशभरात फिरली. पण अनन्याचा अभिनय, तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली नसल्याचं चित्र आता निर्माण झालं आहे. इतकंच नव्हे तर ट्विटरवर बॉयकॉट अनन्या हा ट्रेंड देखील चर्चेत आला आहे. तर अनेकांनी तिच्याबाबत मजेशीर मीम्स ट्वीटरद्वारे शेअर केले आहेत.

या चित्रपटामधील काही सीन तसेच फोटो शेअर करत ट्रोलर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटासाठी अनन्याला ऑस्कर दिला पाहिजे असं एका युजरने तिला ट्रोल करत म्हटलं आहे. तर एका युजरने ‘लायगर’मधील सीनचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या सीनमध्ये विजय आपलं अनन्यावर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतो. पण यादरम्यान अनन्याचे चेहऱ्यावरील हावभाव पाहून मात्र नेटकऱ्यांना राग अनावर झाला आहे.

आणखी वाचा – Liger Movie Review : ना धड लायन, ना टायगर; जबरदस्ती जुळवून आणलेला अन् एक फिस्कटलेला प्रयोग म्हणजे ‘लाइगर’

एक्सप्रेशन क्वीन, यापेक्षा चांगले हावभाव तर माझ्या टूथब्रशचे असतात अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी या सीन पाहता केल्या आहेत. तर काहींना अनन्याच्या एका व्हायरल फोटोची आठवण झाली. जीभ नाकाला लावतानाचा अनन्याचा फोटो सोशल मीडियावर मध्यंतरी प्रचंड व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा तिच्या या फोटोवरून मीम्स तयार करण्यात आले आहेत. एकूणच काय तर प्रेक्षकांनी ‘लायगर’मधील अनन्याच्या भूमिकेला नापसंत केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay deverakonda ananya panday liger movie release actress trolled for her role in film memes viral on social media see details kmd