दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा सध्या त्याच्या आगामी म्युझिक व्हिडीओमुळे चर्चेत आहे. ‘साहिबा’ असं त्याच्या म्युझिक व्हिडीओचं नाव आहे. काही तासांपूर्वीच या म्युझिक व्हिडीओचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये विजय देवरकोंडसह अभिनेत्री राधिका मदान पाहायला मिळाली. अशातच दुसऱ्या बाजूला जिना उतरताना विजय देवरकोंडा जोरात पडल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

अभिनेता विजय देवरकोंडाचा व्हिडीओ ‘फिल्मी ग्यान’ इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये जिना उतरताना विजयचा पाय घसरतो आणि तो जोरात पडताना दिसत आहे. यावेळी आजूबाजूच्या लोकांना जोरात आवाज आला. त्यानंतर सगळेजण विजयला उठायला मदत करताना पाहायला मिळत आहे. एवढं होऊनही विजय शेवटी चाहताला सेल्फी देताना दिसला. माहितीनुसार, या घटनेमुळे विजयला कोणतीही दुखापत झाली नसून विजयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Kamal Haasan said Sarika would be upset if he offered her money
“मला ती आवडली होती, पण..”, कमल हासन यांनी सारिकाबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिला खूप अपमानास्पद…”
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”

हेही वाचा – Bigg Boss 18: हृतिक रोशनच्या लाइफ कोचला दाखवला ‘बिग बॉस’च्या घराबाहेरचा रस्ता, ‘हे’ सदस्य झाले सुरक्षित

हेही वाचा – Bigg Boss 18: एकता कपूरने ‘बिग बॉस’च्या लाडक्या विवियन डिसेनाला चांगलंच झापलं, म्हणाली, “तुला लाँच केल्यानंतर मी…”

विजयच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी विजय ड्रग्स, दारू प्यायल्याचं म्हटलं आहे. तर त्याच्या चाहत्यांनी मीडियावर टीका केली आहे. व्हिडीओ काढून नका म्हणत असूनही हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे विजयचे चाहते मीडियावर भडकले आहेत. “तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, असं विजयचे चाहते मीडियाला म्हणत आहेत.

दरम्यान, अलीकडेच विजय देवरकोंडा गौतम तिन्नानुरीबरोबरच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाला होता. त्याच्या टीमने सांगितलं की, जखमी होऊनही विजय चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. ब्रेक घेण्यासाठी वेळ नाहीये. विजयच्या खांद्याला दुखापत झाली आहे. ही दुखापत कमी करण्यासाठी सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – Video: पहिल्यांदाच लाडक्या लेकीबरोबर दिसले दीपिका पादुकोण अन् रणवीर सिंह, एअरपोर्टवरील व्हिडीओ होतोय व्हायरल

विजय देवरकोंडाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो ‘वीडी १४’ चित्रपटात झळकणार आहे. हा वॉर ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात विजय राजाच्या रुपात पाहायला मिळणार आहे. माय थ्री मुव्ही मेकर्स निर्मित या जबरदस्त बजेट असलेल्या चित्रपटाचं चित्रीकरण २०२५मध्ये सुरू होणार आहे.

Story img Loader