दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाकडून विजय आणि प्रेक्षकांनाही खूप अपेक्षा होत्या मात्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर पूर्ण करू शकला नाही. चित्रपट फ्लॉप झाल्याने विजयलाही धक्का बसला आणि त्याने बरेच दिवस सोशल मीडियावर ब्रेक घेतला होता. आता बऱ्याच दिवसांनंतर विजय देवरकोंडाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे..

‘लायगर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यानंतर विजय देवरकोंडाची ही पहिली सोशल मीडिया पोस्ट आहे. या पोस्टमध्ये शेअर केलेल्या फोटोत तो ब्लॅक कलरच्या आऊटफिट्समध्ये दिसत आहे. या फोटोला त्याने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फोटो शेअर करताना विजय देवरकोंडाने लिहिलं, “सिंगल प्लेयर” त्याच्या या फोटोवर चाहत्यांचा कमेंट्स आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. अनेकांनी तर त्याला ‘वन मॅन आर्मी’ असंही म्हटलं आहे. या पोस्टवर चाहत्यांनी ज्याप्रकारे कमेंट्स केल्या आहेत त्यावरून, विजय देवरकोंडाची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही हे दिसून येतं.
आणखी वाचा-‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री स्वतःच्या भावासह केला होता ऑनस्क्रीन रोमान्स, कुटुंबावरही झाली होती टीका

विजय देवरकोंडाची मुख्य भूमिका असलेला ‘लायगर’ हा चित्रपट पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाद्वारे विजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले पण हिंदी चित्रपटसृष्टीत त्याचे पदार्पण अयशस्वी ठरलं. या चित्रपटाची निर्मिती पुरी जगन्नाथ, करण जोहर आणि चार्मी कौर यांनी केली होती. या चित्रपटात अनन्या पांडे आणि रम्या कृष्णन यांच्याही भूमिका होत्या. चित्रपट जगभरात केवळ ६६.८९ कोटी रुपये एवढीच कमाई करू शकला.

आणखी वाचा-“हिंदी चित्रपट करणं इंटरेस्टिंग गोष्ट आहे पण… ” विजय देवरकोंडाने केला होता खुलासा

विजय देवरकोंडाचा पुढचा चित्रपट ‘जन गण मन – JGM’ हा तेलुगू चित्रपट आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. पुरी जगन्नाथ या चित्रपटाचे दिग्दर्शनही करणार आहेत. मात्र, चित्रपट रखडल्याच्या बातम्यांदरम्यान चार्मीने ट्विट करून या गोष्टी अफवा असल्याचं म्हटलं होतं.

Story img Loader