Vijay Devarkonda Rashmika Mandanna : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा सध्या आपल्या ‘साहिबा’ या म्युझिक व्हिडीओच्या प्रमोशनसाठी मुंबईत आहे. यावेळी एका मुलाखतीत आपल्या खासगी आयुष्याबाबत जास्त माहिती न देणाऱ्या विजयने प्रेम, नातेसंबंध आणि लग्न यावर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

“प्रेम मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे”

‘कर्ली टेल्स’ या यूट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत विजयला विचारण्यात आले की, “अनकंडिशनल प्रेम अजूनही अस्तित्वात आहे का?” यावर त्याने उत्तर दिलं, “प्रेम करणं काय असतं हे मला माहीत आहे, पण अनकंडिशनल प्रेम असतं का हे मला ठाऊक नाही. कारण माझं प्रेम नेहमीच काही अपेक्षांसह असतं. मला असं कोणतं प्रेम माहीत नाही ज्यात अजिबात अपेक्षा नसतात… कदाचित असं प्रेम असू शकतं, पण मला त्याचा अनुभव नाही. शेवटी प्रेम मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मला वाटतं की, प्रेमात थोड्या अपेक्षा असणं योग्यच आहे.”

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”

हेही वाचा…अर्जुन कपूरने ‘या’ व्यक्तीसाठी खांद्यावर काढला टॅटू, फोटो शेअर करत म्हणाला, “ती माझ्यावर…”

“मी सिंगल नाही”

‘नेव्हर हॅव आय एव्हर’ या खेळादरम्यान विजयने तो त्याच्या एका सहकलाकाराला डेट केरत असल्याची कबुली दिली. त्याने म्हटलं, “हो, मी सहकलाकाराला डेट केलं आहे. मी आता ३५ वर्षांचा आहे. तुम्हाला वाटतं का की मी अजूनही सिंगल असेन? प्रत्येकालाच कधीतरी लग्न करावं लागतं. अर्थात, ज्याने हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला असतो त्याला हे लागू होत नाही.”

विजयच्या प्रेमप्रकरणांच्या चर्चा

२०१८ मध्ये विजयचे एका बेल्जियन मुलीबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुरुवातीला हे फोटो मॉर्फ केलेले वाटले, परंतु नंतर तिच्या सोशल मीडियावर विजय आणि त्या मुलीच्या कुटुंबाबरोबरचे काही फोटो सापडले, त्यामुळे दोघे डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले. विजयने यापूर्वी युरोपमधून अनेक फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात त्याने एका पोस्टमध्ये लिहिले होते, “माझ्या कामाच्या वेड्या दुनियेतून सुटण्यासाठी, एक अभिनेता म्हणून मिळालेल्या वेगळेपणातून सुटण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आवडत्या फूडसाठी युरोप हे ठिकाण आहे.”

हेही वाचा…“तुझा काय XX…”, प्रसिद्ध गायिकेविषयी अनु मलिकने केलेली आक्षेपार्ह टिप्पणी; नेमकं काय घडलेलं?

विजय आणि रश्मिका मंदाना यांचं नातं?

२०१८ मध्ये आलेल्या ‘गीता गोविंदम’ आणि २०१९ च्या ‘डियर कॉम्रेड’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर विजय आणि रश्मिका मंदाना यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या. रश्मिकाने अनेक वेळा विजयच्या घरी काढलेले फोटो पोस्ट केले आहेत, त्यामुळे चाहत्यांना अनेकदा वाटते की, ते एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, विजयने या अफवांबाबत कधीही भाष्य केले नाही.

Story img Loader