बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांच्या ‘लायगर’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अखेरीस हा चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. बॉयकॉट ट्रेंडमुळे चित्रपटाला फटका बसणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. प्रत्यक्षात मात्र असंच काहीसं घडताना दिसत आहे. अनन्याची या चित्रपटामधील भूमिका पाहून नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही फ्लॉप ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – चित्रपट सुपरफ्लॉप ठरल्यानंतर कुटुंबासह अक्षय कुमार लंडनला रवाना, पत्नी परदेशातच राहणार कारण…

‘लायगर’ चित्रपटाचा ट्रेलर, विजय देवरकोंडाचा लूक पाहून चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. विजयसह अनन्या देखील या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देशभरात फिरली. मात्र जोरदार प्रमोशन करूनही चित्रपट मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. २५ ऑगस्टला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जगभरात ‘लायगर’ने ३३ कोटी १२ लाख रुपये कमाई केली. पण आता प्रेक्षकच चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये जात नसल्याचं समोर आलं आहे.

ट्रॅक टॉलिवूडच्या वृत्तानुसार हैद्राबाद येथील चित्रपटगृहामध्ये ‘लायगर’ चित्रपटाच्या शोवेळी विजय देवरकोंडा पोहोचला. पण चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहण्यासाठी फार कमी प्रेक्षक असल्याचं विजयला पाहायला मिळालं. हे चित्र पाहून तो निराश झाला. तसेच चित्रपटाची ही अवस्था पाहून त्याचे डोळे देखील पाणावले.

आणखी वाचा – शाहरुख खानला बॉयकॉट ट्रेंडची भीती, हिंदी चित्रपट सुपरफ्लॉप ठरल्यानंतर घेतला मोठा निर्णय

दरम्यान अनन्या आणि विजय देवरकोंडा यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘लायगर’ चित्रपटाकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्येही प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केलं असून निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay deverakonda upset because of liger movie performance less response from audience see details kmd
Show comments