दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी ‘लाइगर’ (Liger Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवरील विजयच्या न्यूड लूकने तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. चित्रपटाच्या ट्रेलरकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेरीस ‘लाइगर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला. २१ जुलैला हैद्राबादमध्ये ‘लाइगर’चा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. त्यानंतर चित्रपटाची टीम मुंबईमध्ये दाखल झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Liger Trailer : अ‍ॅक्शन, ड्रामा, रोमान्स अन्…; ‘लाइगर’चा धमाकेदार ट्रेलर, विजय देवरकोंडाने जिंकली प्रेक्षकांची मनं

मुंबईमध्ये देखील ‘लाइगर’च्या प्रमोशनल कार्यक्रमाला विजय, अनन्या पांडेसह चित्रपटाची टीम उपस्थित होती. यावेळी अभिनेता रणवीर सिंगनेही (Ranveer Singh) या कार्यक्रमाला हजेरी लावली. नेहमीप्रमाणेच अगदी डॅशिंग अंदाजात रणवीरने कार्यक्रमात एण्ट्री केली. पण विजयचा लूक पाहून रणवीरने त्याची खिल्ली उडवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

विजयने या कार्यक्रमासाठी काळ्या रंगाचं टी-शर्ट, कार्गो पँट आणि साधी चप्पल घातली होती. ते पाहून रणवीर म्हणाला, “भाईची स्टाईल तर बघा. असं वाटतंय मी नाही तर हाच (विजय देवरकोंडा) माझ्या ट्रेलर लाँच सोहळ्याला आला आहे.” इतकंच नव्हे तर रणवीरने त्याची तुलना जॉन अब्राहमशी देखील केली. विजयचं टी-शर्टपाहून जॉन अब्राहमनंतर तूच असं रणवीर त्याला म्हणाला.

आणखी वाचा – “आता मी या फोटोवरून ट्रोल होणार का?” शर्टलेस लूकमधील संतोष जुवेकरला पडला प्रश्न

पण रणवीरचं हे वागणं नेटकऱ्यांच्या पसंतीस काही पडलं नाही. तुझ्यापेक्षा विजयच चांगला दिसत असल्याचं अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर करण जोहरने निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. आता हा बहुचर्चित चित्रपट २५ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay deverakonda wear chappals at liger event ranveer singh makes fun of him video goes viral on social media kmd