Siddharth Mallya Marriage: सध्या बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची चर्चा जोरदार सुरू आहे. बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर सोनाक्षी आज लग्नबंधनात अडकणार आहे. अशातच भारतातून विदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्यानं लग्न केल्याचं समोर आलं आहे. त्यानं स्वतः लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ मल्ल्यानं लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं होतं. “लग्नाच्या आठवड्याची सुरुवात झाली”, अशा आशयाची पोस्ट लिहून त्यानं गर्लफ्रेंड जॅस्मिनबरोबरचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता लग्नातील काही खास क्षणाचे फोटो सिद्धार्थ मल्ल्यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हेही वाचा – Video: “आज मी दारू…”, सोनाक्षी सिन्हाच्या लग्नासाठी पोहोचलेल्या हनी सिंगचं वक्तव्य, व्हिडीओ व्हायरल

माहितीनुसार, शनिवारी सिद्धार्थ मल्ल्यानं गर्लफ्रेंड जॅस्मिनशी ख्रिश्चन पद्धतीनं लंडनमध्ये लग्न केलं. जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. “MR & Mrs Muppet”, असं लिहित सिद्धार्थानं लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघं खूप आनंदी असल्याचं पाहायला मिळत आहे. जॅस्मिन पांढऱ्या रंगाच्या गाउनमध्ये दिसत असून सिद्धार्थनं सॉलिड हिरव्या रंगाच्या वेलवेट सूट जॅकेटवर काळ्या रंगाच्या ट्राउजरमध्ये पाहायला मिळत आहे. सिद्धार्थ व जॅस्मिन या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होते.

सिद्धार्थच्या या पोस्टवर अनेकांनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, सिद्धार्थ मल्ल्यानं जॅस्मिनला २०२३ साली कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या एका हॅलोविन पार्टीमध्ये प्रपोज केलं होतं. सिद्धार्थ मल्ल्याप्रमाणेच जॅस्मिन हीदेखील आधी मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत होती.

हेही वाचा – Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचा इन्फ्लुएन्सर नलिनी मुंबईकरांबरोबर ‘अंगारों’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

हेही वाचा –लोकप्रिय मालिकेच्या सहाय्यक दिग्दर्शकाचे २६व्या वर्षी निधन, वाढदिवशीच झाला अपघात; मनवा नाईक भावुक पोस्ट करत म्हणाली…

सिद्धार्थ मल्ल्याचं नाव बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणशी जोडलं गेलं होतं. बऱ्याच वर्षांपूर्वी दोघं एकमेकांना डेट करत होते. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. पण हे नातं जास्त काळ टिकलं नाही. याशिवाय सिद्धार्थचं नाव अनुष्का शर्माशी देखील जोडलं होतं. पण सिद्धार्थनं या अफवा असल्याचं स्वतः सांगितलं होतं. तसंच त्यावेळेस दीपिकाबरोबरच्या नात्याचा त्यानं खुलासा केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay mallya son siddharth mallya married with girlfriend jasmine photos viral pps