भारतातून ९ हजार कोटींचा घोटाळा करून विदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्याच्या मुलाच्या लग्नाचं वृत्त आता समोर आलं आहे. विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या यानं त्याच्या लग्नासंदर्भात इन्स्टाग्राम पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. लवकरच ते विवाहबद्ध होणार आहेत. त्याच्या विवाहासाठीचे सर्व कार्यक्रम तब्बल एक आठवडा चालणार आहेत. त्याच कार्यक्रमामधले काही फोटो सिद्धार्थ मल्ल्यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सिद्धार्थ मल्ल्या सुरुवातीच्या काळात आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा संचालकही होता.

सिद्धार्थ मल्ल्याच्या लग्नाचे कार्यक्रम आठवडाभर चालणार असून त्यातील फोटो त्याने शेअर केले आहेत. या कार्यक्रमांना सुरुवात झाल्यानंतर तेव्हाचा एक फोटो सिद्धार्थनं शेअर करून “लग्नाच्या आठवड्याची सुरुवात झाली”, अशा आशयाची पोस्ट लिहिली आहेत. या पोस्टसोबत त्यानं प्रेयसी जॅस्मिनसोबत एक फोटोही शेअर केला आहे.

mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
kartiki gaikwad brother kaustubh announce engagement
कार्तिकी गायकवाडच्या भावाचं लग्न ठरलं! होणार्‍या पत्नीसह शेअर केला पहिला फोटो, कौस्तुभने गायली आहेत ‘ही’ लोकप्रिय गाणी
Marathi actress Shivani sonar and ambar ganpule marry soon
शिवानी सोनार-अंबर गणपुळे लवकरच चढणार बोहल्यावर; लग्नाआधीच्या विधीला झाली सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केले फोटो
Govinda and wife Sunita Ahuja live separately
गोविंदा व त्याची पत्नी राहतात वेगळे, सुनीता आहुजा पतीबद्दल म्हणाली, “त्याच्याकडे अफेअर्ससाठी वेळ…”
Marathi Actress Hemal Ingle Wedding photo
साडेसात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हेमल इंगळेने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ! पती आहे कलाविश्वापासून दूर…; फोटो आले समोर
singer armaan malik got married to aashna shroff
प्रसिद्ध बॉलीवूड गायकाने गुपचूप उरकलं लग्न; पत्नी आहे वयाने मोठी, विवाहसोहळ्याचे फोटो आले समोर

२०२३ मध्ये केलं होतं प्रपोज!

सिद्धार्थ मल्ल्यानं जॅस्मिनला २०२३ साली कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या एका हॅलोविन पार्टीमध्ये प्रपोज केलं होतं. सिद्धार्थ मल्ल्याप्रमाणेच जॅस्मिन हीदेखील आधी मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत होती. या पार्टीतला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून सिद्धार्थ मल्ल्यानं आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

सिद्धार्थ मल्ल्याचा अभिनयापासून लेखकापर्यंत प्रवास!

दरम्यान, आधी मॉडेलिंग आणि नंतर काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर सिद्धार्थ मल्ल्या लेखनाकडे वळला. सिद्धार्थ मल्ल्यानं मानसिक स्वास्थ्यावर दोन पुस्तकं लिहिली आहेत. गेल्या काही काळापासून सिद्धार्थ मल्ल्या मानसिक स्वास्थ्याच्या क्षेत्रातच कार्यरतदेखील आहे. सिद्धार्थनं ‘इफ आयएम ऑनेस्ट: ए मेमॉयर ऑफ माय मेंटल हेल्थ जर्नी’ हे पुस्तक लिहिलं असून त्यात त्याच्या स्वत: मानसिक स्वास्थ्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल त्यानं लिहिलं आहे. त्याशिवाय लहान मुलांसाठी त्याने ‘सॅड-ग्लॅड’ हे पुस्तकही लिहिलं आहे.

Story img Loader