‘Kadaisi Vivasayi’ Actress Kasiammal’s Dies: विजय सेतुपती-स्टारर ‘कदइसी विवसयी’ या चित्रपटातील सहाय्यक अभिनेत्री कासिममल यांची स्वतःच्याच मद्यपी मुलाने पैशाच्या वादातून कथितपणे हत्या केली असल्याचे समजतेय. ७४ वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्रीने आपला मुलगा नम्माकोडी (५१) याला दारू विकत घेण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला यावरून आई आणि मुलामध्ये वाद झाला. या वादामुळे रागाच्या भरात नम्माकोडीने आईवर लाकडी फळीने हल्ला केला ज्यात ४ फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजता कासियाम्मल यांचा जागीच मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंडियन एक्सस्प्रेसने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, नम्माकोडी, आपल्या पत्नीपासून विभक्त झाला होता व आर्थिक दृष्ट्या आईवर अवलंबून होता. अधिकाऱ्यांनी नम्माकोडीला ताब्यात घेतले आहे आणि त्याच्यावर आयपीसी कलम ३०२ अंतर्गत खुनाचा आरोप लावला आहे. त्यांनी पुरावा म्हणून खुनाचे हत्यारही जप्त केले आहे.

दरम्यान, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगायचे तर, शेतकऱ्यांच्या जीवनाचे वास्तववादी चित्रण करणाऱ्या ‘कदइसी विवसयी’ मधील कासियाम्मलच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. कक्का मुट्टाई फेम मणिकंदन दिग्दर्शित, विजय सेतुपतीची भूमिका असलेल्या या चित्रपटाने अशा विषयाला हाताळताना भारतीय चित्रपटाचा पारंपरिक मार्ग न स्वीकारता शेतीत टिकून राहणाऱ्या लोकांच्या संघर्षांची कहाणी मांडली होती. या राष्ट्रीय पुरस्कार-विजेत्या चित्रपटाला, समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली होती मात्र बॉक्स ऑफिसवर चित्रपट हवे तसे यश मिळवू शकला नव्हता.

तामिळ भाषिक चित्रपट प्रेमींमध्ये अजूनही या चित्रपटाविषयी कौतुकाने चर्चा केली जाते. या चित्रपटातील मुख्य अभिनेता नालंदी यांचे १ फेब्रुवारी २०२२ ला निधन झाले होते. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच मृत्यू पावलेल्या नालंदी यांना ६९ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मरणोत्तर विशेष उल्लेखनीय पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. आता, चित्रपटातील आणखी एका कलाकाराचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे ‘कदइसी विवसयी’ च्या चाहत्यांनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली आहे.