चित्रपट, मालिका या माध्यमातून घराघरात पोहोचलेला विकास पाटील सध्या रंगभूमीवर काम करत आहे. देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल दि बेस्ट’ नाटकात विकास पाहायला मिळत आहे. विकासचं हेच नाटक त्याची पत्नी स्वाती पाटीलने ४० प्रयोगांनंतर पाहिलं. यासंदर्भात अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता विकास पाटीलने बायकोबरोबरचे फोटो शेअर करत लिहिलं, “अखेर मॅडमने २० एप्रिलला माझं नाटक पाहिलं…तुझं नाटक सेट होऊ दे मग मी बघेन असं म्हणत ४० प्रयोगांनंतर ती पाहायला आली…अरे तुझी बायको कधी येणार नाटकाला असं विचारून सगळेच थकले आणि मी त्यांना उत्तर देऊन…आणि अखेरीस तिने नाटक पाहिलं…खूप मनापासून एन्जॉय केलं, पोट धरून हसली आणि शेवटी डोळ्यांत पाणीही तरळलं.”

हेही वाचा- Video: भाऊ कदम यांच्या लेकीनं पहिल्या पगारातून दिलं खास गिफ्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

पुढे विकासने लिहिलं, “सगळं जग बघून गेलं तरी जोपर्यंत आपली माणसं आपलं काम बघत नाहीत आणि त्यांना ते कसं वाटलं हे कळतं नाही तोपर्यंत काही मज्जा नाही राव…काय म्हणता बरोबर ना …?”

विकासच्या या पोस्टवर कलाकारांमंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री सोनाली पाटील, गिरीजा प्रभू, आशा ज्ञाते, भक्ती रत्नपारखी अशा अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा –Video: ‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्याची येतेय नवी मालिका; शनिदेवावर आहे आधारित, पाहा जबरदस्त प्रोमो

दरम्यान, विकास पाटीलच्या अनेक मालिका लोकप्रिय झाल्या. पण तो ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात झळकल्यामुळे अधिक प्रसिद्धच्या झोतात आला. तेव्हापासून विकास नेहमी चर्चेत असतो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikas patil wife swati patil watched the drama all the best actor shared post pps