इंडो-अमेरिकन आर्ट्स कौन्सिल आयोजित पाच दिवसांच्या न्यूयॉर्क भारतीय चित्रपट महोत्सवात गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘अनुमती’ या मराठी चित्रपटाला सवरेत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक मिळाले असून याच चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी सवरेत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना मिळाले.
‘हा भारतीय संवदनेचा सन्मान आहे. कुटूंब, नवरा-बायको, त्यांचे सहजीवन यांचे प्रतिकूल परिस्थितीतही अजोड असणारे भावबंध या भारतीय संवेदना परदेशातील लोकांनाही आपल्याशा वाटल्या हेच या पारितोषिकावरून समजते’, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी दिली.
रत्नाकर मतकरी लिखित-दिग्दर्शित ‘इन्व्हेस्टमेंट’ या चित्रपटालाही पुरस्कारांसाठी नामांकने मिळाली होती. अभिनेत्री दीप्ती नवल यांना ‘लिसन अमाया’मधील भूमिकेसाठी सवरेत्कृष्ट अभिनेत्री पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तर हंसल मेहता यांना ‘शहीद’ चित्रपटासाठी सवरेत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले.

Story img Loader