ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘विष्णूदास भावे’ पुरस्कार मंगळवारी जाहीर झाला. येत्या ५ नोव्हेंबर रोजी सांगली येथे अभिनेत्री फैय्याज यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती पुरस्कार निवड समितीने सांगलीमध्ये दिली.

विष्णूदास भावे पदक आणि ११ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील विक्रम गोखले यांच्या कार्याचा विचार करून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी दिग्दर्शक जब्बार पटेल, नाटककार महेश एलकुंचवार, साहित्यिक शं. ना. नवरे, नाटकाकर रत्नाकर मतकरी यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Story img Loader