बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. आपल्या पहिल्याच चित्रपटातून छाप सोडणारा हृतिक सध्या चर्चेत आहे. नुकताच त्याचा ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे. मूळ तामिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. यात पहिल्यांदा हृतिक, सैफ अली खान एकत्र काम करताना दिसणार आहेत. नुकतंच ता चित्रपटातील ‘अल्कोहोलिया’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात आपल्याला हृतिक रोशन थिरकताना दिसत आहे.

हृतिकच्या चित्रपटांची जशी चर्चा होते तशी त्याच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा होत असते. अभिनेत्री-गायिका सबा आझादला तो डेट करत आहे, परंतु यादरम्यान, अभिनेत्याने सोशल मीडियावर त्याच्या प्रेयसीशिवाय इतर कोणाचे तरी कौतुक केले आहे. ‘रईस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री महिरा खानच्या फोटोवर कॉमेंट केली आहे. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने तिच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये माहिरा खान लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. हा लूक रोशनला त्याचा खूप आवडला आणि त्याने त्याचे कौतुक केले. अभिनेत्याने कमेंट करताना लिहिले, “लव इट”.

“ब्रह्मास्त्रच्या निर्मितीसाठी त्याने… ” दिग्दर्शक अयान मुखर्जीने रणबीरच्या मानधनाबद्दल केला खुलासा

माहिर खान एक प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आहे. ‘रईस’ या चित्रपटात तिने शाहरुख खान बरोबर मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. हृतिक रोशन आणि सबा आझाद अनेक ठिकाणी एकत्र फिरताना दिसतात. मध्यंतरी दोघांना अनेकदा विमानतळावर एकमेकांचा हात धरताना दिसले आहे. याआधी दोघांच्या लग्नाबाबत अनेक प्रकारच्या बातम्याही समोर आल्या होत्या. असे बोलले जात आहे की लवकरच हे कपल लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

हृतिकचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. गुलशन कुमार, टी-सीरिज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनच्या या सगळ्यांच्या वतीने विक्रम वेधा हा चित्रपट प्रस्तुत केला जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे.

Story img Loader