२०१७ मध्ये दिग्दर्शक जोडी पुष्कर-गायत्री यांचा ‘विक्रम-वेधा’ हा तमिळ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आर. माधवन आणि विजय सेतुपती हे कलाकार या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाच्या कथेचा संदर्भ विक्रम-वेताळ यांच्या गोष्टींवर आधारलेला होता. या सुपरहिट चित्रपटाचा हिंदी रिमेक येत्या शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या हिंदी रिमेकमध्ये सैफ अली खान-हृतिक रोशन यांनी अनुक्रमे विक्रम-वेधा या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. दरम्यान ३० सप्टेंबर रोजी आणखी एक बिगबजेट प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर दोन मोठे चित्रपट आमने-सामने येणार आहेत.
‘विक्रम वेधा’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन’ असे दोन मोठे चित्रपट एकाच दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान एका पत्रकार परिषदेमध्ये पुष्कर यांनी या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे. पुष्कर म्हणाले की, “चोल साम्राजाच्या वैभवशाली इतिहासावर रचलेली पोन्नियिन सेल्वन ही भव्या रचना आहे. तुम्ही त्याला हरवू शकणार नाही. सहा खंड असलेल्या या कलाकृतीच्या वाचनाचा आनंद मी तरुणपणी घेतला होता.”
आणखी वाचा – दीपिका- रणवीरच्या वैवाहिक आयुष्यात वादळ? चर्चांवर अभिनेत्यानं सोडलं मौन
पुढे ते म्हणाले, “चेन्नईमधील प्रत्येक लेखकासाठी ही कलाकृती प्रेरणादायी आहे. प्रेक्षकांनी हे दोन्ही चित्रपट पाहावे अशी मी आशा करतो. हा आठवडा सिनेकलाकारांसाठी मेजवानी ठरणार आहे. मी पोन्नियिन सेल्वन पाहायला नक्की जाणार आहे.” हृतिक आणि सैफ देखील या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते.
आणखी वाचा – ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ऐश्वर्या रायच्या अनुपस्थितीचे कारण सलमान खान ?, चर्चांना उधाण
कल्की कृष्णमूर्ती यांची ‘पोन्नियिन सेल्वन’ ही कादंबरी दक्षिण भारतामध्ये फार लोकप्रिय आहे. या कलाकृतीवर चित्रपट बनवण्याचा विचार मणी रत्नम यांना कारकिर्दीच्या सुरुवातीला आला होता. पोन्नियिन सेल्वन कादंबरीची कथा फार मोठी असल्यामुळे त्यांनी हा चित्रपट दोन भागांमध्ये तयार करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटामध्ये विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, त्रिशा, कार्था, जयम रवी या कलाकार प्रमुख कलाकारांनी प्रमुख व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. चित्रपटाची कथा राजा राजा चोला या महान चोल शासकाच्या शासनकाळातील कालखंडावर आधारलेली आहे.